सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत, नाशिक 

तुळ, कुंभ, मकर राशीत शनी असता शेती, खाणी, तेलापासून किंवा यंत्रापासून अकस्मात लाभ होण्याची शक्यता असते. 4,9,1,5, 8,12 राशीत शनी असेल,तर नोकरीत संधी मिळत नाही. समाधानकारक बढती मिळत नाही. हाताखालील लोकांकडून,मालकाकडून त्रास होतो. बहुतेक हे लोक कारखान्यात काम करणारे असतात किंवा खाजगी नोकरी करणारे असतात. मात्र 3,6,7,9, 10, 11 राशीत शनी असता

बुद्धिमान,दिर्घोद्योगी, स्वातंत्र्य उद्योग करणारे, हाताखाली नोकर ही पुष्कळ असतात. ज्यामध्ये दुसऱ्याच्या मेहनतीवर काम करून मालकाने नुसता फायदा मिळवायचा असतो., असे धंदे वरील राशीत शनी असता दर्शवितो. उदाहरणार्थ लहान- लहान यांत्रिक धंदे, पॉवरलूम वगैरे. तसेच शेतीचे धंदे, शेती- खते तयार करणे अगर विकणे हे धंदे यशकारक,पंचमात शनी असून दशमात रवि किंवा गुरू असे ग्रह असता नोकरीत भाग्योदय होतो. 2,7 राशीचा असता धनवान होतो. 9, 12  राशीचा राज्याचा अधिकारी होतो. परंतु अधिक धन मिळत नाही.

बुध, गुरू, शुक्र यांची या ठिकाणी  शनी सोबत युती असता उत्तम सल्लागार म्हणून लौकिक मिळतो.दाम्पत्यसुख  या स्थानात शनी असता पत्नीपुढे काही चालत नाही 

 त्यामुळे एखाद्या वेळी घटस्फोट होण्याची पाळी येते. एकच विवाह होतो. या ठिकाणी  3, 6 राशीचा शनी असता भाग्यशाली स्त्री मिळते. या ठिकाणी शनी असता पुरुष व स्त्री निरोगी असत नाहीत . त्यामुळे दाम्पत्यसुख लाभत नाही. 

संतती– या स्थानी शनी असता 24व्या किंवा 25व्या वर्षी पुत्र संतती होते.स्वभाव— या स्थानीं शनी असता मनुष्य फार खादाड, व विषयासक्त  असतो . या स्थानाचा शनी पीडित असता खाण्या-पिण्याच्या आवडी-निवडी विलक्षण असतात. जेवण हवं तसं समाधाकारक होत नाही. नको ती व्यसने जडतात. व्यक्ती आचारहीन असतात.मुत्सद्दी म्हणून जगातल्या बाजारात त्याची किंमत असली, तरी घरच्या माणसात तो बावळट ठरतो. स्वभाव चिकित्सक, संशयी, आतल्या गाठीचा असतो. हस्तनक्षत्री शनी असता आळशी असतो.

भाग्य— या स्थानी शनी असता पैसा बऱ्यापैकी मिळतो.  समाजात मोठं- मोठ्या व्यक्तींशी मैत्री असते. शत्रूंचा पराभव मोठ्या कौशल्याने करतो. आपला देश व स्वधर्म या बद्दल नितांत आदर असतो. नोकरांपासून नुकसान होते.. जर शनी शुभ संबंधित असेल, तर हाताखालचे लोक खुश असतात. हातून सत्कर्म घडतात.. चतुष्पाद प्राण्यापासून लाभ होतो.  या स्थानी शनी असता योगी होण्याचा संभव अधिक असतो.  प्रपंचातील (क्रमशः) भाग-106

Hari Anant
हरिअनंत, नाशिक 


संपर्क- 9096587586