सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य-शनिशास्त्र

हरिअनंत ,नाशिक   

(The Secret Of A Happy Life) प्रपंचातील साध्या- सुध्या अडचणीसुद्धा दूर करता येत नाहीत, पण सार्वजनिक कामात एखाद्या वेळेस ठोकर बसण्याचा संभव असतो.अध्यात्म व गुढशास्त्राची आवड असते. चित्रा नक्षत्री कन्या राशीत शनी असता सांपत्तिक उत्कर्ष करतो.

या स्थानी शनी असता वयाच्या पूर्वार्धात अति कष्ट, दगदग, अडथळे, कुणाची मदत वेळेवर न मिळणे, लोकांकडून अपवाद इत्यादी. बराच त्रास होऊन मनुष्य जगापुढे येतो.

 या लोकांनी  वृद्धापकाली पैशाचा व्यवहार करू नये. आपला भाग्योदय  परठिकाणी होईल अशा समजुतीने जन्मभूमी सोडून जाऊ नये. या ठिकाणी शनी बिघडला असता दरिद्री, अपयशी, आयुष्यात स्थिर-स्थावरता नाही. नेहमी अपमान. बुद्धिमान असला तरी फुकट जातो. 

शिक्षण-या ठिकाणी शनी असता सुंदर काव्यकल्पना सुचतात. शास्त्रीय अभ्यासाकडे कल असतो. चित्रा नक्षत्री कन्या राशीत शनी असता बौध्दिकदृष्ट्या फार महत्वाचे असते.या ठिकाणचा शनी शुभ राशीचा व रवि चंद्र-  मंगळ यांच्या शुभ दृष्टीत असेल , तर स्वतःच्या  मालकीची जमीन असेल व  गुरे-ढोरे, शेती यात फायदा होईल. 

जीवनयोग- या स्थानी स्वतःचा  व नातेवाईकांचा शनी असता दिर्घायुष्य असते. या ठिकाणचा शनी शत्रू निर्माण करतो. लोकापवाद, गैरसमजूत, भांडणे, वाईटावरील व्यक्ती ह्यामुळे मनस्ताप देणारी विवंचना निर्माण करतो.

1, 8 राशीचा शनी असता अनेक शत्रू होतात. या ठिकाणी 10, 11, 7 राशीचा शनी असता कितीही शत्रू निर्माण जाहले, तरी शेवटी हतबल ठरतात.षष्ठस्थानी शनिशी रवि- चंद्र- मंगळ आणि राहू  युती असता गुप्त शत्रूंपासून अनेक प्रकारे हानी सोसावी लागते. 

या स्थानात शनी असता शत्रू व मत्सरी लोक  यांच्या कडून  पीडा पावणार असते. विरोधामुळेच त्याचा पराक्रम जगाला दिसून येतो आणि विरोधकांची खोड मोडण्याच्या नादाने स्वतः कफल्लक होतो. शिक्षा झाल्यास दीर्घ मुदतीची शिक्षा होते.अपघात व अरिष्ट या स्थानी शनी असता अपघात झाला, तरी त्यातून जगतो. या ठिकाणचा शनी मित्रगृही अगर स्वगृही असेल तर नोकर चांगले मिळणार नाहीत. शनी वक्री अगर पापग्रहाच्या दृष्टीत असेल, तर नोकरकडून नुकसान होईल. 

या स्थानाच्या शनिवर हर्षल, मंगळ व राहू यांचा अशुभ योग होत असल्यास केंव्हा तरी  मोठी चोरी होते.आरोग्य या स्थानातील शनी पीडित  असेल  तर प्रकृतीबद्दल नेहमी तक्रार असते. दीर्घकाळ टिकणारी दुखणी होतात या स्थानाचा शनी 4,8,12 राशीचा असता क्षय रोग,त्वचारोग,अनुवंशिक रोग होतात. या ठिकाणी शनी असून त्यावर रवि, चंद्र, मंगळ यापैकी कोणाचाही अशुभ योग असेल तर आरोग्याची  (क्रमशः)  भाग-107

Hari Anant
हरिअनंत ,नाशिक   

संपर्क -9096587586