सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

(Shani Shastra) मेष,कन्या,वृश्चिक,मकर राशीत शनी असता द्विभार्या योग येतो.इतर राशीत येत नाही.या राशीत शनी असता प्रथम पत्नी रूपाने चांगली मिळत नाही.दुसरी बरी मिळते. 9,5 राशीत असता स्त्री रूपवान, बांधेसूद, चेहऱ्याने चांगली पुरुषी थाटाची असते. या स्थानी 9,7,6 राशीचा शनी असता पुत्रसौख्य लवकर मिळत नाही.वयाच्या उत्तरार्धात पुत्रसौख्य मिळते.या स्थानी 9,7,5,3,1 राशीचा शनी असता उदार ,आनंदी,प्रेमळ, खर्चिक, मनमिळाऊ,प्रसंगी अतिशय रागीट, लोकांच्या उपयोगी पडणारा,परस्त्रीकडे पाहणारा,पण थोडासा दुष्ट, हेकेखोर, हट्टी, घमेंडखोर, दुसरे मूर्ख आहेत असे समजणारा असा असतो. खाणे- पिणे फार चांगले लागते. कोणतीही वस्तू वापरताना मौल्यवान वस्तू वापरण्याची हौस असते. या  स्थानी शनी असता मनुष्य काबाड- कष्टी व व्यसनी असतो. मित्र मंडळीत वजन असते.या ठिकाणी शनी 9,12 राशीचा असता अतिशय कामुक असतो 

या स्थानी 12,8,4 राशीचा शनी असता वयाच्या 28 व्या वर्षी  प्राप्तीला आरंभ होते व 37 व्या वर्षी भाग्योदयास सुरुवात होऊन 43 व्या वर्षी भाग्योदय पूर्ण होतो. 11, 10,6 राशीचा शनी असता दुसऱ्या विवाहानंतर भाग्योदय होतो. तूळेत शनी असता भाग्योदय चांगला होत नाही. या ठिकाणचा शनी विशाखा नक्षत्रात असता समाजप्रियता, राजकारण, मुत्सद्दीपणा ही फळे चांगली मिळतात. शनी हा रवि-गुरूच्या त्रिकोणात असल्यास भाग्यकारक होऊ शकतो.या स्थानी शनी असता कोर्टकचेरीत अपयश मिळते.दुसऱ्या बरोबर केलेल्या व्यवहारात नेहमी काहीतरी घोटाळे होतात.                                  
या ठिकाणी 5, 4 राशीचा शनी असता कोर्टाच्या कामात व भागीदारीच्या कामात, व्यवहारात यश मिळणे कठीण असते. स्नेही,आप्त यांच्यापासून उपद्रव होतो. सिंहेचा असता दरिद्री होतो.9,7,5,3,1 राशीत शनी असता नेहमी अंगास घाम येतो.  

अष्टमस्थानी म्हणजे मृत्यू स्थानी शनी असता व्यवसाय, नोकरी या स्थानी 9,5,1 राशीचा शनी असता ह्या व्यक्ती नोकरी मध्येच असतात खालपासून वरच्या दर्जापर्यंत जाऊ शकतात. काही लोक जज्ज इंजिनियर देखील झालेले आहेत. या व्यक्ती लाचलुचपतिच्या आधीन असतात. एकंदरीत, या व्यक्ती लाचलूचपतीच्या स्वभावाचे असतात 12, 8,6,4 राशीचा शनी असता लाचलुचपत उघडकीस येते.त्यामुळे वरिष्ठ दर्जाच्या जागेस खीळ बसते. 10, 9,5, 4, 3,1 राशीत शनी असता नोकरी करणारे असतात.या स्थानावरून अनपेक्षित धनलाभ होतो. 11,10,7 राशीचा शनी असता धनलाभाचा योग  (Shani Shastra) (क्रमशः) भाग-१११ 

Hari Anant
हरिअनंत,नाशिक 

संपर्क -9096587586