सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य -शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

मकर राशीतला शनी (Shani Shastra) स्वभाव संशयी बनवितो.ह्या व्यक्ती व्यवहारात अतिशय चोख असतात.पैशाच्या बाबतीत चिकट असतात.या ठिकाणी शनी असता आपण स्वतः असताना वडिलांच्या व्यवसायाला उतरती कळा लागते. धंद्याचे दिवाळे वाजते.वरचेवर व्यवसाय बदलावे लागतात. कर्ज होते, निष्कारण चूक नसताना तुरुंगात जावे लागते. कोर्ट-कचेरीत जावं लागतं. वडील जर नोकरीत असतील, तर वरिष्ठ दर्जावरून खाली येणे, सस्पेंड होणे, भ्रमिष्ठ होणे, गाव सोडणे, व्याधी जडणे, एखाद्या वेळी फौजदारी गुन्ह्यात अडकणे, अशा गोष्टी घडतात. माता- पित्याशी स्वतःशी वितुष्ठ येते. स्वतःला मिळकत पुरेशी मिळत नाही. जन्मभूमी सोडून पर ठिकसन गेल्यास भाग्योदय होतो.

12,9,8,5,4,3,1राशीचा शनी असता मानसन्मान होतो. वडिलांच्या पश्चात भाग्योदय होतो.या स्थानातील शनी बिघडला असेल तर सौख्य मिळत ,नाही. दारिद्र्य येतं. जेमतेम पॉट भरते.हालअपेष्टा होतात. अब्रू जाते. हलकी दास्यवृत्ती करावी लागून वरचेवर बदलावी लागते.या ठिकाणी मकर राशीतला शनी शुभ संबंधित असेल,तर नंतर भाग्योदय होतो. या स्थानात  शनी असणाऱ्या व्यक्ती देशाचे पुढारी बनून झपाट्याने पुढे येतात शेवटी स्वतः बरोबर इतरांचे हि नुकसान करतात. 

मेष व कर्क राशीतला शनी शेवटी भाग्यहीन घडामोडी करतो.मात्र या स्थानी मेष,कर्क व वृश्चिक राशीखेरीज शस्नी असेल, स्थित्यनंतर व क्रांती निश्चित होते.11,7,3,10,6,2 राशीत शनी (Shani Shastra) असता आयुष्यभर उन्नती करील. दुर्दैवाने एखाद्यावेळी अशुभ वार्षिक दृष्टियोगात जन्म शनी आला,तर नोकरीत,उद्योगधंद्यात नुकसान होण्याचा संभव,उतारवयात भाग्याला अवकळा लागण्याचा समभाव असतो.शनी कोणत्याही क्षेत्रात असो,उद्योग,नोकरी,वकील वगैरे कोणत्याही क्षेत्रात असता उच्चकोटीला नेतो. भाग्य पुढे आणतो.

या ठिकाणी शनी असता वडिलोपार्जित इष्टेट मिळत नाही.कदाचित असलीच, तर स्वतः घालवतो. स्वतःच्या कमाईवर पुढे यावे लागते. मकर राशीतील शनी शुक्राच्या युतीत असून शुभसंबंधीत असेल,तर शेवटपर्यंत इस्टेट ठेवतो. मात्र या ठिकाणी रवि नसावा. उत्तरषाढा नक्षत्री शनी(Shani Shastra) असेल, तर त्याचे वैशिष्ट हे की,संपात्तिक उत्कर्ष, जीवनातील स्थिरता व यश या दृष्टीने फार चांगला असतो या ठिकाणी 12,9,8,5,4,3,1या राशीस शनी असता आपले अवतारकार्य संले आहे असे सांगता सांगता ह्या व्यक्ती आपला देह ठेवतात. भाग -१२१  

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक 

संपर्क- 9096587586