सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक

12,9,8,5,4,3,1 या राशीस शनी (Shani Shastra)असता आपले अवतार कार्य संपले आहे असे सांगता-सांगता ह्या व्यक्ती आपला देह ठेवतात.12,9,8,5,4,3,1राशीत शनी असता अंगास फार घाम येतो. या ठिकाणी शनी मंगळयुक्त असता मधुमेह, प्रमेह या सारखे रोग होण्याची शक्यता जास्त असते व वयाच्या 27-व्या वर्षी शस्त्रक्रियेची भीती दर्शवितात  6,3 राशीचा शनी असता पित्तविकार होतात. या ठिकाणी शनी असता लहानपणी म्हणजे वयाच्या 10 व्या11 व्या वर्षी आई-वडिलांना मारक होतो. एक स्वतःहून जीवन समाप्त करून किंवा माता- पित्याच्या मृत्यूयोगाने दत्तक जाऊन आणि कोठेतरी परागंदा होणे या कारणाने सौख्य नष्ट होते.भावंडाशी बेबनाव होतो. शनी स्वराशीचा उच्च असता माता- पित्याचे सुख मिळते. कर्कराशीचा असता मातेचा द्वेष करतो सिंहेचा असता वडीलापासून दुःखी होतो.

एकादश स्थानी म्हणजे लाभस्थानी शनी (Shani Shastra)असता उद्योगधंदा, व्यापार,नोकरी,वगैरे या स्थानात11, 9,7,5,3,1 या राशीचा शनी असता ग्रामपंचायत,म्युनिसिपालिटी अशा संस्थांमध्ये व्यक्ती निवडून येतो या ठिकाणी11,10,7,3 राशीचा शनी असेल तर स्त्रियांच्या खास उपयोगी पडणाऱ्या वस्तूंच्या व्यापारात अतिलाभ होतो. शिल्पशास्त्राचा अभ्यासू होतो. या ठिकाणी शनी स्वगृही उच्च राशीचा असता व्यापारात लाभ होतो. हातात माती धरली तरी सोने होते. 

परराष्ट्र वकिलातीत निपुण असतात.7,2 राशीचा असता धनवान होतो. 6,3 राशीचा असता शेती पासून फायदा होतो.11,10,7 राशीचा शनी असून त्यावर रवि, चंद्र,नेपच्यून यांचे शुभ योग होत असतील तर शनीचे परिणाम वृद्धिंगत होऊन वृद्ध व्यक्तींच्या ओळखी,मैत्री स्वतः कायदा तत्वज्ञान,शास्त्रीय विषयात पारंगत असतात.जर या ठिकाणी 10,7,4,1 राशीत शनी (Shani Shastra) असून शनिवर रविचा अशुभ योग जाहला असता उद्योगधंदा  वगैरेचा नाश होतो. पैसे बुडतात. 11,8,5,2 या राशीत शनी असता कोणत्याही कामात अडथळा,विलंब,साधेकाम ही सरळ होणार नाही.

12,9,6,3 राशीचा शनी (Shani Shastra) बहुत करून आशा- आकांक्षा पुरी करणार नाही. नातेवाईकांकडून नुकसान पोहोचते. 8,1 राशीचा असता निर्धन होतो. या ठिकाणचा शनी मध्य वयानंतर पैसा देतो. चंद्र- शनी युती असता दारिद्र्ययोग शनी, हर्षल युती पैशाची बुड दाखवितो. या स्थानी 12, 9, 6,3 राशीचा शनी असता विवाहाच्या बाबतीत चांगला नाही स्त्रीकडील नातेवाईकाकडून सुख मिळत नाही. 11, 10,7,3 राशीचा शनी असेल, तर वंध्या स्त्री मिळते.या स्थानात शनी असता संततीसुखास घातक असतो. 11,9,5,3 राशीचा शनी असता पुत्रसंतती होत नाही. इतर राशीत शनी असता संततिपासून वृद्धपकाळी सुख मिळत (क्रमशः)

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक

भाग-१२२
संपर्क-9096587586