सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

11,9,5,3 राशीचा शनी असता पुत्रसंततीची अडचण होऊ शकते.इतर राशीत शनी असता दोन- तीन संतती देतो.त्यात एखादी पुत्रसंतती देतो. संतती उशिरा होते.11,8,5,2 राशीचा शनी (Shani Shastra) असता  संततीपासून वृद्धपकाळी  सुख मिळत नाही. मुले विभक्त राहतात. या ठिकाणी शनी व राहुची युती असता अल्प संतती असते.एखादे मूल होऊन संतती बंद होण्याचा संभव असतो. 

शनी व नेपच्यून यांची युती संततीस पीडा देते.11,10,7,3– राशीचा शनी (Shani Shastra) असता संतती सुख कमी मिळते. संतती उशिरा होते.  या ठिकाणचा शनी संतती सुखास चांगला नाही. घातक असतो.11,10,7 राशीचा शनी असता संतती कमी होते. 7,2 राशीचा शनी असता पुत्रास  विघ्नकारक होतो.जर 10,7,4,1 राशीत शनीशी अशुभ योग असेल, तर संतती अभागी व क्लेश देणारी होईल.  शनी पंचमात असता संतती सौख्य देणार नाही. शनी संतती फार उशिरा देतो.

या ठिकाणी शनी असता मनुष्य अतिशय धुर्त असतो इतरांबद्दल त्याचे मन संशयी असते. या ठिकाणी शनी धनिष्ठा नक्षत्रात असता लहरी, तापट, सडेतोड असा स्वभाव असतो. या स्थानी शनी असता स्वभाव हेकेखोर, दुराग्रही,खुनशी,पण वरवर गोड बोलणारा, दुष्ट, निर्व्यसनी,कोणत्याच आहारी न जाणारा,आपलेच म्हणणे खरे म्हणणारा, संशयी लोकांच्या सुख- दुःखाची पर्वा न करणारा, आपल्या उपभोगात अडथळा येऊ नये,असे म्हणणारा असतो. 11,10,7 राशीचा शनी असता कल्पक,बुद्धिमान, पाताळयंत्री, चतुरस्त्र असतात.दुसऱ्यावर वर्चस्व गाजविण्याची कल्पना असते. आपली कामे गोडीगुलाबीने करून घेण्याची चांगली युक्ती असते. ह्या व्यक्ती वरील राशींचा शनी असता आपल्या कामा-  शिवाय इतरांशी स्नेह ठेवीत नाहीत. 

शनी(Shani Shastra) पापदृष्टीत असता हलक्या लोकांशी मैत्री असते. एकांगी असतात मित्र फार कमी असतात.- या स्थानात  शनी असता मध्यम वयानंतर पैसा मिळतो. 11,10,9,7,6,3,राशीतील शनी थोड्याशा अवधीने महत्वकांक्षा पूर्ण करतो.11,9,7,5,3,1या राशीत शनी असता साधारण प्राप्ती बरी असते, पण शिल्लक कमी राहते.12,9 8,5,4,1राशीचा शनी असता खर्चाच्या बाबतीत फार कंजूष असतात.यांना व्यसन ही असते.12,8,4राशीचा शनी असता दारूचे व्यसन लागते. या स्थानी शनी (Shani Shastra) चंद्राच्या अशुभ योगात असेल,तर दारिद्र्य येते. शनी व हर्षल यांची युती पैशाची नुकसानी करते.10,7,4,1राशीत शनी असून रवि- चंद्र मंगळाच्या अशुभ दृष्टीमध्ये असेल, तर आयुष्यात नेहमी (क्रमशः) भाग-१२३

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक 

संपर्क-9096587586