सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

जर द्वादशस्थानी शनी असेल,तर उद्योगधंद्यात नेहमी आपत्ती, नुकसान होण्याची भीती.जर शनी (Shani Shastra) मित्र राशीत असेल,तर शेती,दुधाचे धंदे फायदेशीर होतात.अनेक  वेळी धंद्यात निराशा होते. खोटे आरोप येतात.बंधनयोग्य होऊ शकतो.जर शनी हर्षलचे अशुभ दृष्टीत असेल, तर उद्योगधंद्यात पत नाहीशी होते.  मंगळाचे अशुभ दृष्टीत असता चोर, दरोडेखोर, लुटारू यांचेकडून नुकसान संभवते. जर शनी 12,8,4,9,5,1 राशीचा असेल, तर ही माणसे अत्यंत उलाढाल करणारी असतात. सर्व व्यवहार स्वतःच्या अंगावर घेतात. सांपत्तिक अडचणीत येतात.   

 जर शनी 10,6,2,11,7,3 राशिचा असेल, तर काही प्रमाणात बरा. दगडा पेक्षा विट मऊ म्हणण्याची पाळी येते. तरी शुभ दृष्टियोगात असेल, तरच परिस्थिती बरी राहते.जर शनी वक्री असून 6/9 स्थानातील ग्रहाशी प्रतियोग अगर केंद्रयोग करील तर नेहमी कर्जबाजारी स्थिती राहील. 11, 10,7,3,2 राशीचा शनी(Shani Shastra) असता विद्वान शास्त्रज्ञ, नामांकित साहित्यिक असतात. पण त्यांची प्रसिद्धि हायतीत  होत नाही. पैशाचा व्यय होतो.

या स्थानी 12,9,8,5,4,3,1 राशीतला शनी असता पती पत्नी पोक्त असतात  प्रेम कितपत आहे हे सांगणे अतिशय कठीण असते. शनीने कुंडलीतील शुक्र बिघडला असल्यास क्वचित प्रसंगी द्विभार्यायोग होतो. पुष्कळ दिवस विधुरावस्थेत राहण्याचा विचार असतो. या ठिकाणी शनी असता पत्नीशी बिलकुल पटत नाही. पत्नीशी पटले तर मुलांशी पटत नाही. सहचरापासून  फसवणूक करतो व प्रसंगी पुन्हा विवाहाचा योग आणतो. येथील शनीने सहचरापासून फसवणूक द्विभार्यायोग आणावा.8,1 राशीचा शनी असता पती- पत्नी एकमेकांचे छळ करण्यास टपलेले असतात. 

या स्थानी 12,9,8,5,4,3,2, 1 या राशीतील शनी (Shani Shastra) असता संतती कमी होते.11,10,7,6,2 राशीचा असता प्रथम कन्या संतती होते. पुत्र संतती झाली तर जगत नाही. या राशीतील शनी पुष्कळ संतती देतो. या स्थानी 12,9,8,5,4,3,1राशीतील शनी असता आपली संस्कृती कधी सोडणार नाही. 11,10,7,6,2  या राशीचा शनी असता लोकांची जबाबदारी अंगावर घेणार नाही. आपण फार मोठे आहोत अशी भ्रामक समजूत असते. या ठिकाणचा शनी मंगळाने अगर राहून बिघडला असल्यास आपल्यावर काही संकट येणार अशा संशयात असतात.हया व्यक्ती कधी आस्तिक तर कधी नास्तिक असतात. गुरू व शनी यांचा योग असता सहसा कोणाशी पटवून घेत नाही.11,10,7,6,3,2 या राशीतला शनी वेदांत,अध्यात्मज्ञान, परमार्थविद्या, ध्यानधारणा,एकांतवास याची आवड देतो. या स्थानी शनी (Shani Shastra) असणाऱ्या व्यक्ती (क्रमशः) भाग- १२५  

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक 

संपर्क-9096587586