सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

1,10,7,6,3,2, या राशीतीला शनी (Shani Shastra) वेदांत,अध्यात्मज्ञान, परमार्थविद्या, ध्यानधारणा, एकांतवास याची आवड देतो.या स्थानी शनी असणाऱ्या व्यक्ती फार कमी बोलतात. मात्र शनी व बुध असता फार बोलतात. शनी बुधाच्या दृष्टीत असता मानसिक स्थिती बिघडते. व विलंबी आजार होतात.रवि- चंद्राचे अशुभ योग शनिवर असतील, तर औदासिन्य येते. मन अत्यन्त उद्दिग्न होते. या ठिकाणी शनी शुभग्रहाच्या दृष्टीत असता विशेषतः नेपच्चून, हर्षल,गुरू,चंद्र यांचे दृष्टीत असता आध्यात्मिक ज्ञानाची आवड असते. शनिमुळे मनात नेहमी द्वंद्व चालू असते. हा शनी वैराग्य, आसक्तीनाश लवकर करतो.11,10,7  राशीचा शनी असता लाचारी वृत्ती दाखवितो. कर्क राशीचा शनी(Shani Shastra) असता मन सतत चिंताग्रस्त असते. या व्यक्तींना एकांत पसंत असतो. 

या स्थानी12,9,8,5,4,3,1 या राशीतील शनी असता संस्था,संस्थापक व संस्था चालविणारे असतात व अशा निमित्ताने प्रसिद्धीस येतात.जगाच्या पुढे आले की त्यांच्या पुढील पिढीला उतरती कळा लागते.11,10,7,6,2 या राशीच्या शनी असता ह्या व्यक्ती समाजास उपयोगी पडतनाहीत.11,8, 3,या राशीच्या शनी असता प्रसंगी ह्या व्यक्ती महान क्रांतिकारक होतात. प्रसंगी फासावर चढणे, गोळीला बळी पडणे, निर्वासित होणे या गोष्टीमुळे एकाकी मृत्यूमुळे आपल्या नावाची कीर्ती ठेवतील. या स्थानी गुरू व शनी यांचा योग असता यांची सांपत्तिक स्थिती मुळात चांगली असते. नसल्यास चांगली स्थिती निर्माण करून घेतात.या ठिकाणचा शनी उत्तराभाद्रपदा नक्षत्री असता उपासना व योगशास्त्राचा अभ्यास चांगला असतो.

सांपत्तिक स्थिती चांगली असते व धार्मिक ग्रंथाच्या वाचनाकडे जास्त लक्ष असते.विशेषतः मीन राशीतील शनी (Shani Shastra) 10,7,5,1 या स्थानी असता अशीच फळे मिळतात. रेवती नक्षत्रात शनी असता सांपात्तिक उत्कर्ष चांगला होतो. या ठिकाणचा शनी वक्री असेल, अगर अशुभ राशीस असून गुरू,रवि, चंद्र अगर मंगळ यांच्या अशुभ दृष्टीत असेल, तर असा मनुष्य नेहमी कर्जबाजारी असतो.त्याचे दिवाळे निघते. सार्वजनिक कामात अपयश येते व सुख मिळत नाही.11,10,7,3,2   राशीतला शनी असणाऱ्या लोकांना सम्पूर्ण हयातीत प्रसिद्धी मिळत नाही. 

लेखनामध्ये प्रसिद्धी मिळत नाही. या स्थानी शनी निर्धन होतो व सुखरहित असतो. वयाच्या पंचविसाव्या वर्षी   धनहानी करतो. घराण्याची दु:स्थिती ठेवतो व स्वगृहापासून दूर राहण्याचा योग लहानपणीचं आणतो. या ठिकाणच्या शनिमुळे वयाच्या 25व्या वर्षांनंतर तर कधी कधी44 व्या वर्षा नंतर भाग्योदयास प्रारंभ होते. या ठिकाणच्या शनिमुळे जीवनात अत्यन्त प्रतिकूल वातावरण लाभते. व्यक्तीच्या गुणाला फार उशिरा  वाव मिळतो. जीवनात योग्य संधी, भाग्य हयातीत(क्रमशः)  भाग -१२६

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक 

 संपर्क- 90965875861