सर्वात वर

आज शेअर बाजारात नफा वसुलीचे सत्र

विश्वनाथ बोदडे,नाशिक

मोनिटरी पॉलिसी कमिटी ची मीटिंग, आर बी आय चे ती माही धोरण ,जी एस टी च्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत जमा होत असलेली रक्कम, ब्रिटन सरकारने PFIZER कंपानीच्या कोविड लसीला दिलेली परवानगी , बऱ्याच देशातील अर्थव्यवस्था सुधारत असल्यावर संकेत आणि अमेरीकाअजून एक प्रोत्साहन पॅकेज घोषणेची शक्यता ह्या सर्वच कारणांमुळे आज भारतीय शेअर बाजार जबरदस्त VOLTILE बघायला मिळाले.

आज सकाळी जगातील बाजारांच्या संमिश्र संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजार काही हलक्या स्वरूपात नकारात्मक उघडले काही काळ स्थिरावत नाही तोच BANKING क्षेत्रातील शेअरमध्ये विक्रीचा जोर बघायला मिळला.

SENSEX INTRADAY मध्ये 500 अंकांनी तर NIFTY 150 आणि निफ्टी BANK 700 अंकांनी खाली घसरले होते परंतु  दुपारी बातमी आली की, ब्रिटन सरकारने PFIZER कंपनीच्या कोविड लसीला परवानगी दिली त्यामुळे ह्या शेअर च्या किमती 4% ने वधारलेले बघायला मिळले आणि आंतरराष्ट्रीय बाजार सुद्धा सकारात्मक झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारात शेवटच्या सत्रात RECOVERY दिसली व त्याचाच परीणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX फक्त 37 अंकांनी घसरून 44618 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक NIFTY सुद्धा  5 अंकांनी घसरून 13113 ह्या पातळीवर बंद झाला व NIFTY BANK सुद्धा 354 अंकांनी घसरून 29463 ह्या पातळीवर स्थिरावला.


NIFTY १३११३ + ५

SENSEX  ४४६१८ – ३७

BANK NIFTY २९४६३ – ३५४

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 
GAIL ११६ + ५% 

O N G C ८५ + ४% 

ASIANPANT २३१४ + ४%

COAL INDIA १३१ + ४% 

TITAN १३८६ + ३%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

KOTAK BANK १८१३ – ३%

HDFC BANK १४०५ – २%

HDFC २२७४ – २%

SHREE CEM २४६०० – १%

ICICI BANK ४८० – १%

यु एस डी  आई एन आर $ ७४.०३००

सोने १० ग्रॅम            ४८७५०.००

चांदी १ किलो          ६२६९५.००

क्रूड ऑईल              ३२८८.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे,नाशिक

संपर्क-8888280555