सर्वात वर

लॉकडाउनच्या भीतीने शेअर बाजार गडगडला

विश्वनाथ बोदडे,नाशिक


शुक्रवारी अमेरिकेचा बाजार जरी सकारात्मक असला तरी आज सकाळी सिंगापुर निफ्टी नकारात्मक असल्यामुळे व देशभरामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये वाढते करोनाचे रुग्ण आणि पुढे येऊ घातलेला संभाव्य लॉक डाऊन (Lock Down) यामुळे भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market ) आज मोठ्या प्रमाणात गडगडला याचाच परिणाम बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजार तीस समभागांचा  निर्देशांक सेन्सेक्स तब्बल सतराशे पेक्ष्या जास्त अंकांनी घसरून 4783  या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक NIFTY  सुद्धा 524 अंकांनी घसरून 14310 या पातळीवर स्थिरावला त्याच बरोबर बारा बँकिंग शेअर्सचा  निर्देशांक तब्बल 1656 अंकांनी घसरून 30792  या पातळीवर स्थिरावला. 

भारतीय शेअर बाजार घसरण्याचे आजचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात वाढती करोणाची रुग्ण संख्या आणि राज्य सरकार येत्या आठवड्यात पंधरा अथवा आठ दिवसाचा लॉकडाऊन (Lock Down) घोषित करणार आहे असे वारे सुरू आहे ,त्यामुळे आज  बँकिंग फायनान्स मेटल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री दिसली तर फार्मा आय टी या क्षेत्रांनी बाजाराला काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न केला परंतु ते शक्य झाले नाही.

आज भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market ) विदेशी वित्तीय संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विक्री दिसली , त्यामुळे बाजारात सकाळपासूनच सेलिंग प्रेशर बघायला मिळाले होते जेव्हा सकाळी सिंगापुर निफ्टी 230 अंकांनी खाली होती त्याचाच आधार घेऊन भारतीय शेअर बाजारात NIFTY 200 अंकांनपेक्ष्या जास्त अंकांनी खाली उघडला परंतु ही घसरण न थांबता बाजारात दुपारी सुद्धा स्पेलिंग बघायला मिळाली त्यामुळे निफ्टी जवळपास पाचशे अंकाच्या वर नाकारात्मक बंद झाली कोणत्याही प्रकारची खरेदी न दिसल्यामुळे बाजार शेवटी नाकारत बंद झाला. 

बाजाराचे जाणकार सांगत आहे की सध्या जागतिक आणि भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market ) संभ्रम अशा स्थितीत आहे त्याला जसे आम्ही याआधी अधोरेखित केले आहे की, भारतामध्ये करोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यामुळे जाणकारांचे म्हणणे आहे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक करत असताना सेक्टर वाईज गुंतवणूक करावी आणि वेळेनुसार आपल्या गुंतवणुकीमध्ये बदल करत राहणे ही काळाची गरज आहे कारण आपण मागच्या वर्षी जेव्हा मार्च महिन्यामध्ये लॉक डाउन (Lock Down) झाले होते तेव्हा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण बघितली होती परंतु त्यानंतर बाजार सावरून एका सर्वोच्च स्तरावर जाऊन  आता बाजारामध्ये वरच्या स्तरावरून काही का  कारणाने म्हणा  नफा वसुली बघायला मिळत आहे त्यामुळे बाय ऑन डीप ची स्टेटजी कायम ठेवावी.

(Todays Stock Market )  

NIFTY १४३१० – ५२४

SENSEX ४७८८३ – १७०८
BANK NIFTY ३०७९२ – १६५६ 


आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 
DRREDDY ५०९८ + ७%
CIPLA ९०७ + ३%
DIVISLAB ३७९५ + १%
BRITANNIA ३८१४ + १%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

TATA MOTORS २८८ – १०%
ADANIPORTS ७५० – ९%
INDUSINDBK ८४५ – ९%
BAJFINANCE ४५१९ – ७%
UPL ५९१ – ७%

यु एस डी आय एन आर $ ७५.२३२५

सोने १० ग्रॅम          ४६४३७.००

चांदी १ किलो        ६७१४०.००

क्रूड ऑईल            ४५००.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे,नाशिक

संपर्क – 8888280555