सर्वात वर

शेअर बाजारात नवा उच्चांक : SENSEX ४६६६६ तर NIFTY १३६८३ अंकावर

 विश्वनाथ बोदडे,नाशिक

आज भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market)दिवसेंदिवस रोज नवीन SENSEX आणि NIFTY मध्ये  उच्चांक बघायला मिळत आहे.  सकाळी आंतरराष्ट्रीय  बाजारांच्या सकारात्मक संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजार SENSEX 288 अंकांनी तर NIFTY 83 अंकांनी सकारात्मक उघडले ही तेजी काही काळ टिकत नाही तोच बाजारात VOLATILITY बघायला मिळली, परंतु METAL, PSU आणि SUGAR सेक्टरमध्ये खरेदीचा रस दिसला त्याच बरोबर शेवटी बाजाराला साह्य केले ते आंतरराष्ट्रीय बाजाराने करण जागतिक स्तरावरील सर्वच INDICES सकारात्मक होते जरी LANDON मध्ये पुन्हा LOCKDOWN करण्यात आलेला असला तरी आणि केंद्र सरकारने दुपारी SUGAR क्षेत्राला अजून चालना मिळावी म्हणून आणि शेतकऱ्यांना पैसा मिळावा म्हणून काही महत्त्वाचे निर्णय घोषित केले. 

त्याचा परीणाम SUGAR क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली तेजी दिसली त्याच बरोबरच DOCYARD  कंपन्यांच्या समभागांमध्ये सुद्धा खरेदी दिसली यात आघाडीवर होते GARDEN REACH आणि MAZGOAN DOC  महत्त्वाचे म्हणजे आज SENSEX अश्या 46666.46 ह्या  MAGIC FIGURE वर स्थिरावला. तसे बघितले तर आजचे सत्र मोठ्या प्रमाणात VOLATILE होते पण बाजार बंद झाला तेव्हा मुंबई बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 403  अंकांनी वधारून 46666.46 ह्या MAGIC स्तरावर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 115 अंकांनी वधारून नवीन RECORD HIGH वर म्हणजे 13683 ह्या पातळीवर बंद झाला आणि NIFTY BANK सुद्धा हलक्या पण 7 अंकांनी वधारून 30698 ह्या पातळीवर बंद झाला.

बाजार रोज एक नवीन HIGH दाखवत आहे, बाजारात अशीही एक चर्चा आहे की, ज्या प्रमाणे VACINE लोक वाट बघत आहेत त्या प्रमाणे MARKET CORRECTIONS ची सुद्धा वाट बघितली जात आहे. 

सध्या बाजारात IPO खूप चांगला परतावा देत आहेत दोन दिवसापूर्वी LISTING झालेला BUGER KING हा नवीन IPO 60 रुपयांमध्ये देण्यात आला होता त्याची आज किंमत होती NSE मध्ये 194.40 तर BSE मध्ये 199.25 ही होती तर उद्या बंद होणार MRS. BECTORS FOOD SPECIALITIES हा IPO आज पर्यन्त 8 TIMES OVER SUBSCRIBES झाला आहे हा IPO सुद्धा LISTING नफ्यासाठी आणि लांब  अवधीसाठी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी असे बाजारातील जाणकार सांगत आहेत.

NIFTY १३६८३ + ११५

SENSEX  ४६६६६ + ४०३

BANK NIFTY ३०६९८ + ७

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स (Todays Stock Market)

HINDALCO २५१ + ३% 

BHARTIARTL ५१८ + ३% 

HDFC २४१५ + ३%

DIVISLAB ३७२२ + ३% 

O N G C १०३ + ३%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

ICICI BANK ५१२ – १%

INDUSINBK ९१८ – १%

ULTRA CEMCO ५११४ – १%

GAIL १२४.४० – १%

N T P C १०५ – १%

यु एस डी  आई एन आर $ ७३.६६५०

सोने १० ग्रॅम        ४९७००.००

चांदी १ किलो      ६६३००.००

क्रूड ऑईल          ३५१५.००

Vishwanath Bodade
 विश्वनाथ बोदडे,नाशिक


Mobile : 8888280555