सर्वात वर

Todays Stock Market News : बाजारात RECOVERY,SENSEX 452 अंकांनी वधारला

विश्वनाथ बोदडे,नाशिक 

(Todays Stock Market News) कालच्या HEAVY FALL नंतर आज सुद्धा तेच चित्र राहाते का ? असे वाटत होते कारण जरी रात्री आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर बाजारात खूप मोठ्या चढ उतारा नंतर RECOVERY दिसली तसेच चित्र आज भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market News) बघायला मिळाले कारण सकाळी जागतिक स्तरावरील बाजार संमिश्र संकेत देत होते त्याच बरोबर सिंगापूर निफ्टी सकारात्मक होती त्याचेच पडसाद बाजार उघडला तेव्हा दिसले कारण SENSEX 166 अंकांनी तर NIFTY 51 अंकांनी सकारात्मक उघडले पण सकाळच्या सत्रापासूनच बाजार VOLATILE राहिला कारण सकाळी भारतीय बाजारात परत SHARP SELLING दिसायला लागली.

परंतु आज खऱ्या अर्थाने बाजाराला सावरण्याचे काम IT आणि फार्मा क्षेत्रांनी केले त्याचाच परीणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक तब्बल 452 अंकांनी वधारून 46006 ह्या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 138 अंकांनी वधारून 13466 ह्या पातळीवर बंद झाला आणि NIFTY BANK सुद्धा खूप मोठ्या चढ उतार नंतर 169 अंकांनी वधारून 29626 ह्या पातळीवर बंद झाला.

काल भारतीय शेअर बाजारात खूप मोठ्या प्रमाणात SELLING बघायला मिळली।होती कारण UK मध्ये LOCKDOWNआणि नवीन विषाणू ह्या मुळे संपूर्ण जगातील बाजारात भीतीचे वातावरण होते परंतु जेव्हढा भारतीय बाजार घसरला होता त्याचे परीणाम जागतिक बाजारावर दिसले नाही त्यामुळेच बाजारात आज परत खरेदी दिसली.

आजच्या बाजाराच्या लांबीचा विचार केला तर 1537 समभाग सकारात्मक दिसले व 1325 समभाग नकारात्मक होते आणि 165 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसला नाही.काल सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री होती परंतु आज सर्वच सेक्टर GREEN मध्ये बंद झाले यात आघाडीवर होते IT  क्षेत्र. 

NIFTY १३४६६ + १३८

SENSEX  ४६००६ + ४५२

BANK NIFTY २९६२६ + १६९%

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स  

ADANIPORTS ४६९ + ६%

HCL TECH ९१७ + ५%

TECHM ९४४ + ४%

INFY १२२० + ४%

GAIL ११८ + ३%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

KOTAK BANK १९०१ – १%

HDFC २३९८ – १%

BAJFINANCE ५०१० – १%

ULTRACEMCO ४९८८ – १%

INDUSINBK ८४० – १%

यु एस डी  आय  एन आर $ ७३.९२५०

सोने १० ग्रॅम        ४९९६०.००

चांदी १ किलो       ६८१००.००

क्रूड ऑईल            ३५०३.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे,नाशिक