सर्वात वर

शेअर बाजार तेजीत : SENSEX ५१ हजार पार

विश्वनाथ बोदडे ,नाशिक

भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market) सध्या कभी खुशी कभी गम अशा प्रकारचे वातावरण दिसत आहे. काल संथपणे बंद झालेला शेअर बाजार आज सकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संकेतांच्या आधारे १६० अंकांनी सकारात्मक उघडला त्यानंतर बाजार नकारात्मक सुद्धा झाला होता परंतु हळूहळू बाजारामध्ये विविध क्षेत्रांच्या समभागांमध्ये खरेदी त्यात प्रामुख्याने आघाडीवर होते आयटी क्षेत्र याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX  380 अंकांनी 51017 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक NIFTY  93 अंकांनी वधारून 15301 या पातळीवर बंद झाला तर बारा बँकिंग शेअर मिळून तयार झालेला BANK NIFTY 22 अंकांनी वधारून 34 6 84 या पातळीवर बंद झाला.

आजच्या बाजारामध्ये (Todays Stock Market) प्रामुख्याने आयटी क्षेत्राच्या समभागांमध्ये खरेदी दिसली, बाजारात सध्या स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आपल्याला बघायला मिळत आहे. मागील काही दिवसांमध्ये बँकिंग शेअर वधारले होते त्यानंतर मेटल आणि आता आयटी या पद्धतीने बाजारामध्ये मॅनेजमेंट की काय अशी गुंतवणूकदारांमध्ये चर्चा आहे तर दुसरीकडे बाजारातील जाणकार सांगत आहेत की ज्या पद्धतीने व्हर्चुअल करन्सी मध्ये मोठ्या प्रमाणात वत घट होताना दिसत आहे त्यामुळे तेथील गुंतवणूकदार आपला पैसा शेअर बाजारांमध्ये वळवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे बाजारामध्ये गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक प्रत्येक खालच्या स्तरावर करायलाच हवी परंतु ही गुंतवणूक एकाच सेक्टर मध्ये अथवा एकाच स्टॉक मध्ये न करता विविध क्षेत्रांच्या समभागांमध्ये विभागून करायला पाहिजे त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर चांगल्याप्रकारे परतावा मिळू शकतो

(Todays Stock Market)

NIFTY १५३०१ + ९३

SENSEX ५१०१७ + ३८०

BANK NIFTY ३४६८४ + २२

आज निफ्टी वधारलेला शेअर्स 

BAJAFINSV ११९०० + ५%

BAJFINANCE ५७६८ + ३%

INFY १३९५ + ३%

GRASIM १४०८ + ३%

WIPRO ५२७ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

POWERGRID २२६ – ३%

HINDALCO ३८१ – ३%

JSW STEEL ६८४ – ३%

TATA STEEL १०८० – २%

NTPC १११ – २%

यु एस डी आय एन आर $ ७२.८३५०

सोने १० ग्रॅम         ४९०६३.००

चांदी १ किलो        ७२६००.००

क्रूड ऑईल            ४७९२.००

विश्वनाथ बोदडे ,नाशिक

संपर्क – 8888280555