सर्वात वर

शेअर बाजारात पडझड : सेन्सेक्स ८८२ अंकांनी कोसळला

विश्वनाथ बोदडे, नाशिक 

देशभरात वाढतील करोनाची रुग्ण संख्या याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market) मागील काही दिवसापासून आपण बघत आहोत.आज भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market) सकाळपासून विविध क्षेत्रांमध्ये विक्री दिसत होती ,त्यामुळे SENSEX 1000 पेक्षा जास्त तर बँक निफ्टी 1200 अंकणपेक्षा खाली घसरला होता, परंतु फार्मा मेटल या क्षेत्रामध्ये काही प्रमाणात मागणी आल्यामुळे बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 882 अंकांनी घसरून 47 949 या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी तब्बल 258 अंकांनी घसरून 14359 या पातळीवर स्थिरावला, त्याचबरोबर बँक निफ्टी 769 अंकांनी घसरून 31208 या पातळीवर बंद झाले.

सध्या बाजारात मुख्य भीती म्हणजे लॉकडाऊन ची आहे कारण लॉकडाऊन झाला तर पर्यटन हॉटेल मनोरंजन विमानसेवा , शिक्षण अशा विविध क्षेत्रांवर काही काळासाठी परिणाम होऊ शकतो त्याच बरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा त्याचा परिणाम बघायला मिळू शकतो.

आज बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री बघायला मिळाली त्याचे कारण म्हणजे लॉकडाऊन सुरू झाला तर उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम होईल आणि बँकांचे ज्यांनी कर्ज घेतले आहे ते कर्ज परत मिळण्यास वेळ लागू शकतो त्याचा परिणाम बँकांच्या सीटवर दिसू शकतो.

बाजाराची जाणकार असेही सांगत आहे की सरकारने हाती घेतलेले डीसइन्वेस्टमेंटचे प्रोसेस ला सुद्धा यामुळे ब्रेक बसू शकतो त्यामुळे आज या सर्व भागांमध्ये सुद्धा विक्री बघायला मिळाली.


आपण मागील लॉक डाऊन दरम्यान बघितले होते की शेअर बाजाराने नीचांक दर्शवून काही क्षेत्रांच्या समभागांमध्ये चांगली मागणी दिसली आणि त्यानंतर बाजाराने सर्वात मोठा उचांक सुद्धा गाठला होता. त्यामुळे बाजाराचे जाणकार सांगत आहेत ती गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक पुन्हा पडताळून बघावी आणि परिस्थितीनुसार आपली गुंतवणूक कायम ठेवावी या क्षेत्रांवर वाईट परिणाम होईल त्या क्षेत्राचे सहभाग काढून टाकावे आणि या क्षेत्रांना फायदा होईल त्या क्षेत्राचे समभाग आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ठेवावे.

(Todays Stock Market)

NIFTY १४३५९ – २५८

SENSEX ४७९४९ – ८८२

BANK NIFTY ३१२०८ – ७६९


(Todays Stock Market) आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 
DR.REDDY ५००५ + २%
CIPLA ९५० + २%
BRITANNIA ३७३० + १%
INFY १३६३ + १%
WIPRO ४७२ + १%

(Todays Stock Market) आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

ADANIPORTS ७१९ – ५%
POWERGRID २०१ – ४%
ONGC १०३ – ४%
HEROMOTOCO २७८८ – ४%
INDUSINDBK ८३२ – ४%

यु एस डी आय एन आर $ ७४.९६५०

सोने १० ग्रॅम         ४७४२०.००

चांदी १ किलो        ६९१७०.००

क्रूड ऑईल            ४७२०.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे, नाशिक 

संपर्क – 88 88 280 555