सर्वात वर

आज दिवसभर शेअर बाजार अस्थिर : सेन्सेक्स २५९ अंकांनी वधारला

विश्वनाथ बोदडे,नाशिक

काल भारतीय शेअर बाजारात सुट्टी होती ,परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर शेअर बाजार सुरु होते.काल सिंगापुर निफ्टी जवळपास २०० अंकानपेक्षा जास्त सकारात्मक होते. परंतु आज सकाळी भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market ) हलक्या स्वरूपात सकारात्मक उघडले आज बाजारात फ्युचर आणि ऑप्शन्सची विकली सेटलमेंट होती त्यामुळे अपेक्षेनुसार बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार म्हणजेच VOLATILITY बघायला मिळाली.

सकाळी बाजार सकारात्मक उघडला, परंतु बाजारामध्ये काही प्रमाणात विक्री बघायला मिळाली.दुपारच्या सत्रात बाजारात खाजगी बँका आणि आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी दिसली त्यामुळे बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक SENSEX 259 अंकांनी वधारून 48 803 या पातळीवर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक NIFTY 76 अंकांनी वधारून 14 581 या पातळीवर बंद झाला, तर 12 बँकिंग मिळून तयार झालेला बँक निफ्टी हा निर्देशांक 341 अंकांनी वधारून 32 113 या पातळीवर बंद झाला.

आजच्या बाजाराच्या (Todays Stock Market ) लांबीचा विचार केला तर  1226 समभाग सकारात्मक होते व सोळाशे अकरा समभाग नकारात्मक होते 162 समभागांमध्ये कोणताही बदल दिसला नाही.

बाजारातील जाणकारांच्या मते बाजारामध्ये सध्या महाराष्ट्र आणि देशभरात वाढत असलेली कोविड रूग्ण संख्या आणि महाराष्ट्रात लागू झालेला लॉक डाऊन यामुळे बाजारात काही क्षेत्रांमध्ये विक्री बघायला मिळत आहे बाजारावर लॉकडाउन चे संकटआहेच कारण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी असे सांगितले आहे की राज्यांनी आपली स्थानिक स्थिती बघून लॉक डाऊन चा निर्णय घ्यावा कारण सरसकट लॉकडाऊन लावला गेला तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
आज आज बाजाराला सावरण्याचे काम आयटी क्षेत्र त्यातही प्रामुख्याने टीसीएस विप्रो यांनी केले तर इन्फोसिस मध्ये विक्री बघायला मिळाली त्याच बरोबर खाजगी क्षेत्रातील बँका जसे आय सी आय सी बँक एचडीएफसी बँक यामध्ये खरेदी दिसली परंतु बाजाराला आज ऑटोमोबाईल्स टेक्स्टाईल या क्षेत्रांनी नाराज केले.

आम्ही नेहमी नमूद करत आहोत की बाजारामध्ये गुंतवणुक ही वेळेनुसार बदल करत जावा जेणेकरून आपल्याला आपल्या गुंतवणूक वर नफा मिळवता येईल आणि बाय ओन टिप्स चे तंत्र नेहमी अवलंबावे.
 (Todays Stock Market )  

NIFTY १४५८१ + ७६
SENSEX ४८८०३ + २५९
BANK NIFTY ३२११३ + ३४१ 


(Todays Stock Market )आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 
TCS ३२२७ + ४%
WIPRO ४३४ + ४%
CIPLA ९१४ + ३%
ONGC १०५ + ३%
ICICI BANK ५७६ + २%

(Todays Stock Market )आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

GRASIM १३४९ – ३%
EICHERMOT २४१९ – ३%
MARUTI ६६४३ – ३%
INFY १३६३ – ३%
INDUSINDBK ८५९ – २%

यु एस डी आय एन आर $ ७५.२०००

सोने १० ग्रॅम          ४६५२०.००

चांदी १ किलो        ६७८८०.००

क्रूड ऑईल           ४७३६.०० 

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे,नाशिक

संपर्क-8888280555