सर्वात वर

शेअर बाजारात तेजी : सेन्सेक्स ८४८ अंकांनी वधारला

विश्वनाथ बोदडे, नाशिक

Todays Stock Market

मागील काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र हलचाली बघता त्याचे पडसाद भारतात सुद्धा बघायला मिळाले आहेत. भारतामध्ये सध्या करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील दिसत आहे ,आता याचे परिणाम केव्हा येतील हे जरी वेळ ठरवत असली तरी लवकरच आपण या संकटातून सर्व बाहेर येणार असा सकारात्मक विचार भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) करताना दिसत आहे.

सध्या भारतात लसींचा तुटवडा भासत आहे परंतु दुसरीकडे फार्मा कंपनी मोठ्या प्रमाणात यासंबंधी प्रयत्नशील दिसत आहे.आजच्या बाजाराचा विचार केला तर भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) सकाळी सकारात्मक उघडला. काही काळ बाजारामध्ये थोड्या प्रमाणात चढ-उतार बघायला मिळाले परंतु शेवटच्या सत्रात बाजारामध्ये बँकिंग फायनान्स मेटल या क्षेत्रांमध्ये चांगली मागणी बघायला मिळाली आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 848 अंकांनी वधारून 49 580 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक  NIFTY सुद्धा 245 अंकांनी वधारून 14923 या पातळीवर बंद झाला तर 12 बँकिंग समभागांचा निर्देशांक NIFTY BANK तब्बल 1289 एवढ्या अंकांनी वधारून ते 33 459 या पातळीवर स्थिरावला.

आजच्या सत्रात खऱ्या अर्थाने बँकिंग आणि फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात मागणी दिसली. सध्या बाजारात गुंतवणूकदार द्विधा स्थितीमध्ये दिसत आहे कारण भारतामध्ये कोविडची रुग्ण संख्या काही प्रमाणात नियंत्रणात येत असती तरी सामान्य माणसांमध्ये भीतीचे वातावरण आहे परंतु एकदा लसीकरण योग्य पद्धतीने झाले तर भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market) पुन्हा एकदा तेजीचे वातावरण आपणास बघायला मिळू शकते परंतु सध्या गुंतवणूकदार गुंतवणूक करायला पुढे येताना दिसत नाही त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये बाजारामध्ये संमिश्र वातावरण आपणास बघायला मिळाले आहे.

जर गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची असेल तर आपली गुंतवणूक ही विविध क्षेत्रातील सर्व भागांमध्ये केली पाहिजे त्यासाठी कोणत्या गोष्टींचा परिणाम कोणत्या शेअर्स वर होत असतो याचा अभ्यास असणे आवश्यक आहे.आता सध्या जरी गुंतवणूकदार संभ्रमात असला तरी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक करत असताना बाय ऑन डीप चे तंत्र अवलंबणे आवश्यक आहे म्हणजेच आपली गुंतवणूक विविध क्षेत्रात विभागून टप्प्याटप्प्याने करायला हवी.

NIFTY १४९२३ + २४५

SENSEX ४९५८० + ८४८

BANK NIFTY ३३४५९ + १२८९


आज निफ्टी वधारलेला शेअर्स 
INDUSINDBK ९५८ + ८%

SBIN ३८४ + ७%

ICICI BANK ६२४ + ४%

HDFC BANK १४३९ + ४%

AXIS BANK ७०९ + ३%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

CIPLA ८८३ – ३%

BHARTIARTL ५४८ – २%

LT १३८८ – २%

SBI LIFE ९६५ – १%

NESTLIND १७०६० – १%

यु एस डी आय एन आर $ ७३.४४७५

सोने १० ग्रॅम।      ४७९६०.००

चांदी १ किलो     ७१८८०.००

क्रूड ऑईल         ४७७७.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे, नाशिक

संपर्क – 8888280555