सर्वात वर

काळानुसार गुंतवणूकीची सवय बदलावी का.! वाचा सविस्तर

विश्वनाथ बोदडे,नाशिक

शेअर बाजार (Todays Stock Market )असो किंवा कोणतीही गुंतवणूक ही काळानुसार बदल केला पाहिजे,त्याचे कारण म्हणजे प्रत्येक क्षेत्रावर वेळेनुसार परीणाम होत असतात,जर आपण कोविड चे उदाहरण घेतले तर आपण बघितले आहे की,जरी SENSEX अथवा NIFTY खाली असले तरी काही क्षेत्रात चांगला परतावा काही स्टॉक मिळाल्याचे चित्र मध्ये दिसत आहे. 

मागील काही दिवसात करोनाचे रुग्ण कमी झाले होते तेव्हा फार्मा क्षेत्रातील समभाग खालच्या दारात मिळत होते जसे रुग्ण वाढले लागलीच हे समभागांचे दर वधारलेत त्याच बरोबर वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढले की IT आणि TELECOM क्षेत्रातील समभागांची मागणी वाढलेली दिसते, त्याच बरोबर जेव्हा शेअर बाजार (Todays Stock Market) खाली येईल अशी भीती असते अथवा खाली येतो तेव्हा सोने आणि चांदीची मागणी वधारते आणि दर सुद्धा वधारतात.

त्यामुळे गुंतवणूक करतांना केव्हाही एकाच क्षेत्रात गुंतवणूक न करता वेळेनुसार आपली गुंतवणूक विविध क्षेत्रात विभागून करत राहावे. 
आजचे सत्र सुद्धा VOLATILE बघायला मिळाले ,सकाळी जागतिक संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजार सुद्धा नकारात्मक उघडले होते ,

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला ब्रेक बसला व मेटल आणि इन्फ्रा क्षेत्रात नफा वसुली दिसली तर काही प्रमाणात बाजाराला IT, SUGAR , PSU BANKING ने सावरले ह्याचाच परीणाम म्हणून बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX  154 अंकांनी घसरून 49591 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा  पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 39 अंकांनी घसरून 14834 ह्या पातळीवर बंद झाला तर BANK NIFTY सुद्धा 334 अंकांनी  घसरून 32448 ह्या पातळीवर स्थिरावला. जागतिक संकेत सुद्धा सध्या करोनाच्या वाढत्या रुग्ण संखेने त्रस्त आहेत

त्यामुळे आपली गुंतवणूक ही विभागात करावी असे बाजाराचे जाणकार सांगत आहेत.

(Todays Stock Market) 

NIFTY १४८३४ – ३९

SENSEX ४९५९१ – १५४

BANK NIFTY ३२४४८ – ३३४


आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स (Todays Stock Market) 

CIPLA ८८७ + ५%

SUNPHARMA ६३६ + ४%

HINDUNILVR २४७१ + ३%

TECHM १०५१ + २%

TATACONSUM ६८५ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

BAJFINANCE ४८७८ – ३%

UPL ६३६ – ३%

TATA STEEL ८९९ – २%

ULTRACECO ६८२६ – २%

NTPC १०३ – २%

यु एस डी आय एन आर $ ७४.८१५०

सोने १० ग्रॅम          ४६२२०.००

चांदी १ किलो        ६६६९०.००

क्रूड ऑईल             ४४३९.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे,नाशिक


संपर्क –  8888280555