सर्वात वर

शेअर बाजार दिवभर अस्थिर : तेजीला ब्रेक

विश्वनाथ बोदडे ,नाशिक 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक संकेत यांच्या आधारे भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) सुद्धा गॅप अप म्हणजे सेन्सेक्स साधारणपणे 250 अंकांनी सकारात्मक उघडला, काही काळ ही तेजी कायम सुद्धा राहिली परंतु त्यानंतर बाजारामध्ये दिवसभर चढ -उतार बघायला मिळाले म्हणजेच आजीचे सत्र नफा वसुलीचे सत्र असेही म्हणावे लागेल.

आज बाजारामध्ये मागील काही दिवसापासून बँकिंग क्षेत्रातील समभगांमध्ये आपण तेजी बघितली होती त्याच समभागांमध्ये विक्री बघायला मिळाली म्हणजेच एक प्रकारे नफा वसुली बघायला मिळाली मागील काही सत्रांमध्ये विदेशी वित्तीय संस्थांकडून भारतीय शेअर बाजारात चांगली गुंतवणूक झालेली दिसली आहे त्यामुळेच विविध क्षेत्रांच्या समभागांमध्ये आपल्याला त्याची सुद्धा बघायला मिळाली होती.

अमेरिकेतील बाजाराने काल नवीन उच्चांक गाठला  होता त्यामुळे सिंगापुर निफ्टी सुद्धा सकारात्मक होती ,भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) सकाळी सकारात्मक उघडला परंतू बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक SENSEX  फ्लॅट म्हणजेच 14 अंकांनी नकारात्मक बंद होऊन 50637 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक NIFTY  सुद्धा 11 अंकांनी सकारात्मक बंद होऊन 15 208 या पातळीवर बंद झाला तर 12 बँकिंग समभाग मिळून तयार झालेला BANK NIFTY  हा निर्देशांक मात्र 282 अंकांनी घसरून 34662 या पातळीवर बंद झाला.

जसे आम्ही मागील काही लेखांमध्ये उल्लेख केला होता की बाजार यापुढे VOLATILE व  चढ  उतारी चा राहील व त्याच प्रमाणे सेक्टर स्पेसिफिक अशा समभागांमध्ये आपल्याला खरेदी सुद्धा बघायला मिळू शकते.कमोडिटी बाजाराचा विचार केला तर मागील काही दिवसापासून संध असलेले क्रूड ऑईलचे दर वाढत असताना दिसत आहे, याचा परिणाम इंधनाचे दर वाढण्यावर होईल परिणामी महागाई ही सुद्धा वाढू शकते.

(Todays Stock Market)

NIFTY १५२०८ + ११

SENSEX ५०६३७ – १४

BANK NIFTY ३४६६२ – २८२ 

(Todays Stock Market) आज निफ्टी वधारलेला शेअर्स 

ASIANPAINT २९१८ + ४%

TITAN १५७१ + ३%

JSW STEEL ७०२ + ३%

EICHERMOT २६२६ + ३%

BRITANNIA ३४४१ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

HDFC BANK १४८१ – २%

HDFC LIFE ६६१ – २%

AXIS BANK ७३२ – १%

RELIANCE १९६४ – १%

COAL INDIA १४८ – १%

यु एस डी आय एन आर $ ७२.८३५०

सोने १० ग्रॅम        ४८४२५.००

चांदी १ किलो       ७१३५८.००

क्रूड ऑईल           ४८००.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे ,नाशिक 

संपर्क – 8888280555