सर्वात वर

शेअर बाजार दिवसभर अस्थिर : सेन्सेक्स मध्ये ३६ अंकानी वाढ

दिवसभरातील शेअर बाजारातील घडामोडी जाणून घ्या 

विश्वनाथ बोदडे.नाशिक

अमेरिकेतील बाजारामधून सकारात्मक संकेत असताना सुद्धा सकाळी सिंगापुर निफ्टी फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन झाल्याने भारतीय शेअर बाजार सुद्धा सकारात्मक ओपन झालेत.ही तेजी काही काळ टिकली परंतु त्यानंतर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला दिसले, त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा(Todays Stock Market) तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 28 अंकांनी वधारून 48 832 या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY 36 अंकांनी वधारून 14618 या पातळीवर बंद झाला त्याच बरोबर 12 बँकिंग शेअर मिळून तयार झालेला बँक निफ्टी हा निर्देशांक 135 अंकांनी नकारात्मक बंद होऊन 31 977 या पातळीवर स्थिरावला.

तसे बघितले तर आज बाजारात संमिश्र वातावरण बघायला मिळाले कारण काल विप्रो या कंपनीचा तिमाही निकाल चांगला आला म्हणून या कंपनीचे समभाग 9 टक्‍क्‍यांनी वधारून बंद झाले.

जसे आम्ही अधोरेखित करत आलो आहेत की कोविंड रुग्ण संख्या वाढत असल्याने बाजारामध्ये भीतीचे वातावरण आहे त्यामुळे विदेशी वित्तीय संस्था आणि स्थानिक वित्तीय संस्था आपला गुंतवणुकीसाठी चा हात आवरून आहेत.

बाजारामध्ये जरी चढ-उतार दिसत असले तरी कमोडिटी मार्केटमध्ये सोने आणि चांदी ह्या धातूंच्या किमती मागील काही दिवसापासून वधारत आहेत जसे आपण मागील वर्षी बघितले की लॉक डाऊन च्या काळामध्ये एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदी याला प्राधान्य दिले होते त्यामुळे त्यांचे दर उंच स्तरावर पोहोचले होते.
हवामान खात्याने यावर्षी पाऊस चांगला होईल याचे भाकीत केल्यामुळे बाजाराने याला सकारात्मक घेतले आहे.

(Todays Stock Market)  

NIFTY १४६१८ + ३६
SENSEX ४८८३२ + २८
BANK NIFTY ३१९७७ – १३५ 

(Todays Stock Market)आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 
WIPRO ४६९ + ९%
HINDALCO ३६८ + ४%
CIPLA ९४० + ३%
ASIANPAINT २६५४ + ३%
ULTRACEMCO ६७०४ + ३%

(Todays Stock Market) आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

JSWSTEEL ६१७ – २%
ICICI BANK ५६५ – २%
BAJFINANCE ४५९९ – १%
LT १३५७ – १%
TATA STEEL ८८७ – १%

यु एस डी आय एन आर $ ७४.४९२५

सोने १० ग्रॅम       ४६९००.००

चांदी १ किलो        ६८७५८.००

क्रूड ऑईल           ४७१७.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे.नाशिक


 संपर्क – 8888280555