सर्वात वर

UNICEF World चा युव्हा युथ चायलेंज अवॉर्ड नाशिकच्या Espalier स्कूलला जाहीर

नाशिक- UNICEF World चा युव्हा युथ चायलेंज अवॉर्ड नाशिकच्या Espalier स्कूलला जाहीर झाला आहे. नाशिक मधील इस्पॅलियर स्कूल चा ऑनलाइन रेडिओ इस्पॅलियर या प्रोजेक्टची निवड होऊन त्याला हा पुरस्कार जाहीर झाल्याचे इस्पॅलियर स्कूलचे संस्थापक  सचिन उषा विलास जोशी यांनी सांगितले UNICEF World च्या या पुरस्कारामुळे नाशिकच्या शिरपेचात मनाचा तुला रोवला गेला आहे. 

UNICEF World ने या महामारी मध्ये विविध समस्यांवर उत्तरे शोधण्यासाठी आरोग्य, शिक्षण, व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात Generation Unlimited या नावाने स्पर्धात्मक उपक्रम राबविला. या उपक्रमामध्ये मध्ये ३९ देशातील १५ लाख हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांनी सहभाग घेतला. त्यातून एक लाखावरून अधिक इंक्युबॅशन स्टार्ट आयडिया आल्या.भारतातील युनिसेफ इंडिया आणि DFC India यांनी भारत सरकार निती आयोग यांच्या मार्फत इस्पॅलियर स्कूलचा रेडिओ इस्पॅलियर प्रोजेक्टची नियुक्ती केली.

हेन्रिएटा होलसमॅन फॉर हे अमेरिकन सरकारचे अधिकारी आहेत जे  युनिसेफचे कार्यकारी संचालक असून यांनी ३९ देशातील आठ उत्तम प्रोजेक्टची निवड करून त्यांना सन्मानित केले.यामध्ये शिक्षण क्षेत्रातील जगातील उत्तम प्रोजेक्ट भारताला जाहीर झाला.

नाशिक मधील इस्पॅलियर स्कूल चा ऑनलाइन रेडिओ इस्पॅलियर या प्रोजेक्टची निवड होऊन आता यूनिसेफ तर्फे याला सीड फंडिंग उपलब्ध होईल असे हि जोशी यांनी सांगितले.

ऑनलाईन शिक्षणासाठी इस्पॅलियरत स्कूल तर्फे रेडिओची निर्मिती झाली, बालवाडी, पहिली ते दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचे अडीच हजार भाग ऑनलाइन रेडिओवर उपलब्ध केले. शहरातील विद्यार्थ्यांसोबत हा रेडिओ विविध सरकारी शाळा आणि पालकांना उपलब्ध करून दिला. यात जिल्हा परिषद शाळा, आदिवासी विद्यार्थी यांना याचा फायदा झाला. 

भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की भारतातील शालेय विद्यार्थी आणि शिक्षक अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर युनिसेफने निवड केली. हा प्रोजेक्ट शिक्षण तज्ञ किरण सेठी, डी.एफ.सी हेड नंदिनी सूड, युनिसेफ इंडियाच्या अनन्या पांडे यांनी सहकार्य केले.