सर्वात वर

त्यांच्या सामाजिक जाणीवेतून आदिवासी कुटुंबाची चूल पेटली

युनायटेड व्ही. स्टँड फांउडेशनतर्फे तिनशे आदिवासी कुटुंबांना किराणा किट वाटप

नाशिक : कोरोना संसर्ग आजाराच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अनेक कुटुंब उद्‌वस्थ झाली आहेत. कोरोनाचा वाढता उद्रेकाला पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊनची अंमलबजावणी केली आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला, आदिवासी जनतेची देखील बिकट अवस्था झाली. मात्र आदिवासी जनतेची चुल विझली नाही पाहिजे, या सामाजिक जाणीवेतून नाशिक येथील युनायटेड व्ही. स्टँड फांउडेशनतर्फे(United V. Foundation) मंगळवारी (दि.१) रोजी आदिवासी पाड्यावरील तब्बल तीनशे कुटुंबाना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

नाशिक येथील युनायटेड व्ही. स्टँड फांउडेशनतर्फे (United V. Foundation) गेल्या दीड वर्षांपासून अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. गेल्यावर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजाराचा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून या फांउडेशनतर्फे अनेक समाजिक कार्यक्रम राबविण्यात आले असून यात गोरगरीबांना अन्नदान, कपडे आदी उपक्रम राबविले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल ६४ दिवस शहरातील गोरगरीबांना दोन वेळचे जेवणाचे मोफत डब्बे पुरविले होते. 

याशिवाय गेल्या सात वर्षांपासून या फांउडेशनतर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक कुटुंबांतील सदस्यांचे निधन झाले. अनेक बालके पोरकी झाली तर अनेकांचा रोजगार बुडाला. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेने धुमाकुळ घातला आहे. कोरोनाचा वाढता उद्रेक थांबविण्यासाठी तब्बल महिनाभर टप्प्याटप्प्याने कडक निर्बंध राज्य शासनाने लागू केले आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील रोजगार बुडाला. अनेकांच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली. याच सामाजिक जाणिवेतून युनायटेड व्ही. स्टँड फांउडेशनतर्फे मंगळवारी (दि.१) दिवसभर त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील मेटकावरा पाडा, वेधपाडा, चाफेची वाडी यासह अनेक आदिवासी पाड्यांवरील गोरगरीब कुटुंबाना तब्बल तीनशे किराणा किटचे वाटप केले. यामुळे गोरगरीब आदिवासींच्या चुल पेटल्याने त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले होते. यावेळी आदिवासी कुटुंबियांनी या फांउडेशनच्या सदस्यांचे हात जोडून आभार मानले.

यावेळी युनायटेड वि. स्टॅड फांउडेशनचे (United V. Foundation) सागर मटाले, अंकुश चव्हाण, शिवम पाटील, गुरु सिंग, शुभम गोऱ्हे, निलेश पवार, ओम काठे, अमोल पवार, संतोष मुंढे, राहुल काकड, कुणाल पाटील, नयन झगडे, अक्षय गवळी, महेंद्र पोरजे, हरिष सिंग, गौरव आव्हाड, रोहन कुमावत, कल्पेश वाणी, युगंधर दोंदे, अमित कस्तुरे, गौरव रहाणे, गिरीष गलांडे यांच्यासह साक्षी फुगे, रश्मी हिरे, सुजाता मटाले, अश्विनी कांबळे, स्मिता वाघ, श्वेता सोनवणे, अनुष्का मटाले आदी तरुणी देखील उपस्थित होत्या.

पावसातही नाही थांबला मदतीचा हात

मंगळवारी (दि.१) नाशिक शहरासह इगतपुरी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. आदिवासी पाड्यांवर मदत पुरविण्यासाठी गेलेल्या या सदस्यांना पहिल्या पावसाचा सामना करावा लागला. पण भर पावसातही या तरुणांनी आपला मदतीचा हात मागे न घेता सायंकाळी उशिरापर्यन्त भर पावसात आदिवासींच्या वाड्यावर जावून किराणा किट वाटप केले.

पुरग्रस्तांना मदतीचा हात

युनायटेड वि स्टँड फांऊडेशन (United V. Foundation) तर्फे आजवर आपत्ती काळात अनेकांचा मदतीचा हात दिला आहे. कोल्हापूरसह इतरत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्‌भवलेल्या पूर परिस्थितीतही या फांऊडेशनतर्फे तब्बल सहा मालट्रक भरुन जिवनावश्यक वस्तुंची मदत पुरविण्यात आली होती. तेव्हा देखील फांऊडेशनच्या सदस्यांनी मागे न हटता गोरगरीबांसह पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता.

ऑक्सिजन वितरणात देखील सक्रीय

नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. या काळात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून १०० ऑक्सिजन सिलिंडर पुरविले. सदर ऑक्सिजन सिलिंडर गरजुंपर्यन्त पोहचविण्याचे मोलाचे काम या युनायटेड वि. स्टॅड फांउडेशनच्या (United V. Foundation) माध्यमातून पार पडले आहे.


असे होते किराणा किट

युनायटेड वि. स्टॅड फांउडेशनतर्फे (United V. Foundation) पुरविण्यात आलेल्या किराणा किट मध्ये पीट ५ किलो, तांदूळ ३ किलो, बेसण १ किलो, तुरदाळ १ किलो, रवा १ किलो, मीठ, हळद, तेल, बिस्कीट, साखर, चहा पावडर, मिरची पावडर, ओआरएस पावडर, मास्क, सॅनिटायझर आदींचा समावेश होता.

नाशिकच्या या पोरांनी आम्हा गोरगरींबाची भूक जाणली. आम्हाला कुठे मिळतोय शहरात रोजगार. पण या लॉकडाऊनमुळे आमच्या खाण्या-पिण्याची दैना झाली आहे. मात्र या पोरोंनी आज आमची चूल विझण्यापासून वाचविली हेच आमच्यासाठी आज देव झाले. यांच्यात आम्हाला देवमाणूस दिसला. – रघुनाथ पागी, मेठ कावरापाडा, ता. त्र्यंबकेश्वर