सर्वात वर

आजपासून १८ वर्षावरील नागरीकांच्या लसीकरण नोंदणीस सुरुवात

१८ वर्षांवरील नागरिकांनी लस घेण्यासाठी नोंदणी कशी करावी…? जाणून घ्या 

आज दुपारी  ४ पासून करता येणार नोंदणी 

नवी दिली – देशभरात १ मे पासून १८ वर्षावरील नागरीकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असून आज दुपारी ४ वाजे पासून अधिकृत संकेतस्थळावर १८ वर्षांवरील नागरीकांना लसीकरणासाठी नोंदणी (Vaccination Registration)करता येणार आहे.ही नोंदणी करणे अनिवार्य आहे.  www.cowin.gov.in या संकेस्थळावर नागरीकांना आपले नाव नोंदवून लसीकरणाची तारीख आणि वेळ निश्चित करता येणार आहे. एका मोबाईल नंबरच्या साह्याने आपल्याला चार जणांची नावे रजिस्टर करता येणार आहे. 

४५ वर्षाच्या व्यक्तींना ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी केंद्रावर जाऊनही नोंदणी (Vaccination Registration) करण्याचा पर्याय आगोदर प्रमाणे खुला ठेवण्यात आला आहे. 

…… अशी कराल नोंदणी 

(Vaccination Registration)

पहिला डोस घेण्यासाठी खालील वेबसाईट वर Register करा.
www.cowin.gov.in
Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.

OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो  तेथे टाका व क्लिक करा.

Vaccine Registraction Form भरा.क्लिक करा. 
यामध्ये तुम्हाला आधार, पॅनकार्ड ,ड्राइव्हिंग लायसन्स या पैकी एक पर्याय नोंदवावा लागेल. 

नाव जन्मतारीख ,लिंग ,या सारखी माहिती भरावी लागेल 
समोरील पेज वर लाभार्थांची नावे जोडता येतील एका मोबाईल नंबर वरून आपण ४ जणांची नावे आपण नोंदवू शकतो. 

 Schedule Appointment वर क्लिक करा. नंतर आपल्या परिसराचा पिन कोड टाका. (उदा.422101)  

Sessaton निवडा-  सकाळचे किंवा दुपारचे.

Vaccine Center व Date निवडा.

Appointment Book करुन ती coform करा.

Appointment Detail’s चा मेसेज मोबाईलवर येईल.

त्यामुळे Vaccination Center वर  Vaccine देणे सोपे होईल.