सर्वात वर

लोकशाहीची बीज रुजविण्यासाठी आपण सुशिक्षित होणे गरजेचे – शरद पोंक्षे

स्वातंत्रवीर सावरकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही वेगळी

नाशिक –  इंदिरा गांधीनी ज्यावेळेला भारताने अणुबॉम तयार केला त्यानंतरचे सर्व युद्धे आपण जिंकली. आपल्या सीमासुरेक्षेचे काम हाती घेतले त्यामुळे इतर राष्ट्रातून येणाऱ्या घुसखोऱ्यावर  आळा बसला आहे. आपण माणस शिक्षित होतो, ज्ञानी होतो आपल्याला ज्ञान प्राप्त होते, आपण माहितीसाठी गुगल वर हवी ती माहिती शोधू शकतो परंतु आपण ज्ञानी झाल्याने सुशिक्षित होत नाही. लोकशाहीची बीज रुजविण्यासाठी आपण सुशिक्षित होणे गरजेचे आहे.असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी मांडले  सार्वजनिक वाचनालय,नाशिकच्या वतीने शब्द जागर भेटूयात घरोघरी या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्या व्याख्याने पहिले पुष्प गुंफण्यात आले.त्यावेळे अभिनेते शरद पोंक्षे बोलत होते.

सावरकरांना लोकशाही वेगळी अभिप्रेत होती ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जन्माला आलेली पिढी पहिली पिढी २१ वर्षाची सज्ञान होईपर्यंत भारतात लोकशाही नको होती. या सज्ञान पिढीला शिक्षणातून ज्ञान आणि स्वंयम  अधिकार ज्ञात क रून दिल्याशिवाय लोकशाही यशस्वी होणार नव्हती आपण लष्करी दृष्ट्या सर्व सामर्थ्यशाली असल्या शिवाय आपल्या हातात अहिंसा शोभून दिसत नाही. या बाबत शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी काही सूचना केल्यात… 

 १ देशस्वतंत्र झाल्यानंतर पहिले आपले सैन्यबलाढ्य करण्यासाठी शास्त्र अणुबॉमतयार करावेत त्यासाठी विदेशातील शास्त्रज्ञांकडून आपल्या शास्त्रज्ञांना ट्रेनिंग द्यावे.

२ देशाची सुरक्षा करणारे पोलीस आणि सैन्यबळ यांना उत्तम पगार द्यावेत जेणे करून ते सक्षम बनतील कारण तेच खऱ्या अर्थाने देशाची सुरक्षा करणारे आहेत त्यासाठी त्यांची जीवन शैली व्यवस्थित राहणे गरजेचे आहे. 

३ तरूण पिढी घडविणारी जे शिक्षक आहेत ते खऱ्याअर्थाने पुढची पिढी तयार करण्याचे काम करतात त्यांना सुध्दा उत्तम पगार द्यावेत. सुरक्षा व्यवस्थेत काम करणारी माणसे श्रीमंत आणि समृद्ध व्हायला हवी. आजची तरुण पिढी लष्करात जायला तयार व्हायला हवी सावानाने अतिशय उत्तम उपक्रम सुरु केला आहे असे विचार अभिनेते शरद पोंक्षे यांनी सार्वजनिक वाचनालयात झालेल्या शब्द जागर भेटूयात घरोघरी या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे स्वागत – प्रास्ताविक सांस्कृतिक सचिव प्रा.डॉ.वेदश्री थिगळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी करून दिला. नाट्यगृह सचिव अॅड. अभिजीद बगदे,  यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत अनेकांनी आनंद व्यक्त करून समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष, संजय करंजकर, सहा. सचिव प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, अॅड. भानुदास शौचे, अर्थ सचिव उदयकुमार मुंगी, गिरीश नातू, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी, वस्तुसंग्रहालय बी.जी.वाघ, डॉ. धर्माजी बोडके, प्राचार्य डॉ. संगीता बाफना, वसंत खैरनार, श्रीकांत बेणी, यांच्यासह जवळपास अनेक  रसिकांनी या व्याख्यानाचा / मान्यवर झूम ऑन लाईन अँपवर  उपस्थित होते. 

आजचे व्याखान शुक्रवार दि. २८ मे,२०२१ रोजी सांयकाळी ६.०० वा.

Click here to Join Zoom Meeting_https://us02web.zoom.us/j/83223519204?pwd=V3diTGlGVVp4bm4zTDE2TDM4Vk5Edz09Meeting ID: 832 2351 9204Passcode: 1234