सर्वात वर

सुप्रसिद्ध उद्योजक राधाकिसन चांडक यांचे निधन

नाशिक –  सुप्रसिद्ध उद्योजक हॉटेल पंचवटी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राधाकिसन रामनाथ चांडक(Radhakisan Chandak) यांचे हृदयविकाराने निधन झाले ते ८० वर्षांचे होते.आज (१३ मे ) दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. 

राधाकिसन चांडक (Radhakisan Chandak) हे यांनी नाशिकच्या हॉटेल असोसिएशनची स्थापना केली होती त्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते.संस्कृती वैभवचे कार्याध्यक्षही होते.त्याचप्रमाणे कॉक ब्रँड सिन्नर बिडीज प्रा.लि चे संचालक होते.अतिशय मनमिळाऊ, दिलदार आणि हसत-खेळत आनंद उपभोगण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे अबालवृद्धांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध तर होतेच परंतु प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारे असे होते,.नाशिक जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात त्यांचे महत्वाचे योगदान होते.उद्योजक अतुल चांडक यांचे ते वडील होते.

त्यांच्या पश्चात मुलगा अतुल चांडक,सून शिवमाला चांडक, नातू गौरव चांडक,मुलगी रचना भुतडा असा परिवार आहे.आज सायंकाळी त्याच्यावर नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

श्रद्धांजली !

ज्येष्ठ उद्योजक राधाकिसन चांडक यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. सिन्नरच्या विकासात राधाकिसन चांडक यांनी मोलाचा हातभार लावला आहे.  त्यांनी नाशिकसह राज्यभरात पंचवटी हॉटेलची मालिका उभारली. सामाजिक कार्यात नेहमीच ते अग्रेसर होते.
महाराष्ट्र महेश सेवा निधी या संस्थेच्या अध्यक्षपदावरून विधवा महिलांना पेन्शन योजना लागू करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे. नाशिकच्या सांस्कृतिक चळवळीत अग्रस्थानी असलेल्या संस्कृती वैभव या संस्थेत त्यांनी महत्वाची पदे भूषविली. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ उद्योजक काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने चांडक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय चांडक कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली !

छगन भुजबळ

मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा