सर्वात वर

Whatsaap वर नवं फीचर्स : डिलीट न करता लपवता येणार चॅट

मुंबई- Whatsaap ने आणलेल्या नव्या फीचर्स मध्ये आता आपली चॅट डिलीट न करता लपवू शकता येणार आहे.समोरच्या व्यक्तीने आपला मोबाईल बघायला मागितल्यास आता आपली पर्सनल चॅट व्हाट्सअ‍ॅप यूजर्स लपवू शकणार आहेत. व्हाट्सअ‍ॅपच्या ‘Archive’ या फीचरच्या मदतीने तुम्ही आपले चॅट्स किंवा ग्रुप चॅट्सदेखील सोप्या पद्धतीने लपवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला गरज असेल तेव्हा Unarchive देखील करू शकता.

सर्च बारच्या शेजारी असलेल्या तीन टिंबांवर क्लिक केल्यावर Archived पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यावर अर्काइव्ह केलेली सगळी चॅट्स दिसतील त्यावर क्लिक करून ती Unarchive करता येतील.

काय करावे लागेल !

१ ) पहिल्यांदा WhatsApp उघडल्या नंतर २)त्यानंतर चॅट्स सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला जे चॅट्स लपवायचे आहेत त्यावर काहीवेळ दाबून धरा. ३) टॉप बारवरून ‘Archive icon ला सिलेक्ट करा.यामुळे तुमचे चॅट्स Archive होतील आणि स्क्रीनवर चॅट्स दिसणार नाहीत. त्यानंतर जर चॅट बघायची असल्यास चॅट च्या तळाशी जाऊन Archive केलेली चॅट Unarchive करा