सर्वात वर

कणकेची बिस्कीटं

ऋतुगंधा पटवर्धन

Wheat Flour Biscuits

साहित्य-: एक वाटी कणीक, अर्धी वाटी डाळीचे पीठ, तिन छोट्या वाट्या पिठीसाखर, तीन छोट्या वाट्या साजूक तूप किंवा डालडा तूप जोपर्यंत तो कणकेचा गोळा भिजून अपने जास्त लागले तर तुम्ही जास्त तूप पण घेऊ शकता, बदाम काजूचे तुकडे…

कृती-:(Wheat Flour Biscuits) १ वाटी कणीक घ्यायची अर्धी वाटी डाळीचे पीठ घ्यायचं छोट्या ३ नैवेद्याच्या वाट्या पिठीसाखर घ्यायची हे सगळं मिक्स करायचं हे सगळं तुपात भिजवायचे साजूक तुपामध्ये किंवा डालडा तुपात भिजवलं तरी चालेल तुमची आवड असेल तर त्याच्यामध्ये बदाम काजूचे तुम्ही तुकडे टाकू शकता तो कणके सारखा गोळा भिजवायचा त्याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून त्यांना शेप द्यायचा चौकोनी गोल किंवा बदामाचा मग त्याच्यावर तुम्ही तुम्हाला हवे तसे डिझाईन तुम्ही तयार करू शकता आणि मी वरून त्याच्यावर गार्निशिंगसाठी साखर पेरली आहे.

तुमच्याकडे मायक्रोओव्हन नसेल तर तुम्ही कढईमध्ये मीठ टाकून त्याच्यामध्ये डबा ठेवयचा आणि बटर पेपर मध्ये ती बेक करायची १० ते १५ मिनिटात तयार होतात आणि तुमच्याकडे बटरपेपर  नसेल तर साधा फुलस्केप पेपर पण चालतो पण त्याला पूर्ण  तेल लावावं लागतं चारी बाजूंना कुठलीच बाजू रिकामी राहायला नको त्याच्यात ठेवले तरी तुमची बिस्कीटं तयार होतात.. गरम लगेच तुटतात ती जरा गार झाली की व्यवस्थित निघतात आणि एकदम खुसखुशीत लागतात पटकन होणारी ही मस्त बिस्किटं (Wheat Flour Biscuits) आहेत…करून पहा 

ऋतुगंधा पटवर्धन