सर्वात वर

खोटं का बोलतात मुलं ???

डाॅ स्वाती गानू टोकेकर 

ब-याच आईवडिलांचा एक मोठा प्राॅब्लेम असतो तो म्हणजे मुलं खोटं का बोलतात?खरोखरच आपलं मूल खोटं बोलतं ही गोष्ट पालकांना अस्वस्थ करणारी,टेन्शन वाटणारी असते.मात्र चिंता नको चिंतन करायला हवे.थोडं माहीत करून घेऊ या.

साधारणतः तीन -चार वर्षांची झाली की मुलं खोटं बोलू लागतात. त्यांना हे थोडंफार समजायला लागतं की तुम्ही mind reader नाही आहात.चार ते सहा वर्षांची मुलं जास्त खोटं बोलू शकतात.त्यांच्या चेह-यावरचे एक्स्प्रेशन्स ,बोलण्याचा टोन ते बरोबर मॅच करतात.जसजसे ते मोठे होते त्यांची शब्दसंपदा आणि इतर लोक काय विचार करतात याची समज वाढते.मग ते सफाईदारपणे खोटं बोलू शकतात. टीनएजर मुलें तर व्हाईट लाईज प्रकारचे खोटं बोलतात.कारण त्यांना इतरांच्या भावना दुखवायच्या नसतात.

मुलं खोटं बोलतात त्याची नेमकी कारणं तरी काय असतात?

1) मुलांना आपली कल्पनाशक्ती वापरून फॅन्टसी क्रिएट करायला ,त्यात मरायला फार आवडतं.

2)खरं बोलल्यावर तुम्ही रागवाल, शिक्षा कराल,मार द्याल अशा परिणामांच्या भीतीने  ते खोटं बोलतात.

3)लोकांना इंप्रेस करायला, आपण कोणीतरी स्पेशल आहोत हे दाखवायला गोष्टी एक्झागरेटेड करून ते सांगतात. 

4) पीअर ग्रुप किंवा समवयस्क मित्रांच्या ग्रुपमध्ये आपण फिट बसावं म्हणून,इनसिक्युरिटीमुळे ते खोटं बोलतात. 

5)लहान मुलं त्यांना हवी ती वस्तू मिळावी म्हणून खोटं बोलतात.

6) काही मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव अर्थात lack of confidence असतो तर काहींना आपली सेल्फ एस्टीम वाढवून काही गोष्टी मिळवायच्या असतात म्हणून ते खोटं बोलतात.

7) मुलं स्वतःची चूक लपवायला म्हणजेच स्वतःला कव्हर करायला खोटं बोलतात. 

कारणं काहीही असली तरी मुलांचं खोटं बोलणं कुणालाच योग्य वाटणार नाही, आवडणार नाही. मुलांनी खोटं बोलू नये किंवा ती खोटं बोलत असतील तर त्यांना यापासून कसं परावृत्त करावं ते समजून घेऊ या.

1) मुलं खोटं बोलताहेत हे कळलं की ते बहुतेक वेळा लाॅन्ग स्टोरी क्रिएट करतात तेव्हा त्यांना म्हणावं की तू जे म्हणालास ते खरंच आहे की असं व्हावं ही तुझी इच्छा आहे ?तुम्ही Non judgmental response दिला की ते सांगतात.हे खरं नाही पण असं व्हावं असं मला वाटतं. त्यांच्या कल्पनाशक्तीला डिस्करेज करु नका.त्यांना अशा गोष्टी करू दे,वापरू दे कल्पनाशक्ती पण त्या गोष्टी आहेत ते खरं नव्हे हे स्पष्ट सांगा.

2)मुलं negative consequences टाळण्यासाठी खोटं बोलतात .त्यांना एक संधी द्या. नाही सांगितलं तर परत दोन मिनिटं वेळ द्या. मुलांना म्हणावं की मला माहीत आहे की जे झालंय ते सांगणं तुला जड जातंय पण तू खरं बोललीस तर मला आवडेल. मला ते ॲप्रिशिएट करावंसं वाटेल.यातून मुलांना तुमच्याबद्दल विश्वास वाटायला लागेल.

3)मुलांना खोटं बोलण्याची सवय लागलकांसाठी आहे असं वाटत असेल तर आपल्या discipline strategies तपासून पहा.  Harsh discipline actually turn kids into good liars. कारण तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल याची मुलांना भीती वाटत असेल तर ते खोटं बोलण्याची शक्यता अधिक असते. 

4)मूल कोणत्या प्रकारचं,किती लेव्हलचं आणि कोणत्या परिस्थितीत खोटं बोललं त्यानुसार त्याच्यासाठी काही गोष्टी उदा. खेळ, टी.व्ही ,व्हिडिओ गेम कमी केलं जाईल असं स्पष्ट शब्दात सांगावं.

5)कांगावा, खोटं बोलणं हे जर केवळ लक्ष वेधणारं असेल तर दुर्लक्ष करा नाहीतर सांगा की मला माहीत आहे तुला काही झालेलं नाही. तू खोटं सांगतोयस.मात्र मुलांना  तू खोटारडा आहेस असं लेबलिंग दर वेळेला करू नका. नाहीतर आपले आईबाबा आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत असं मुलांना वाटेल.

6)मुलांनी खरं बोलण्यासाठी आग्रह धरा.Truth ही  family policy आहे हे समोर करा.तुम्ही घरात एकमेकांशी खरं बोललात तर मुलांना विश्वास वाटतो की इथे चूक झाली तर सांगता येईल. होउ शकतं असं पण परिणाम काय होतील याचा विचार करायला हवा. खोटं सांगितलं तर वाईट वाटेल सगळ्यांना. तू खरं बोललात हे मला आवडलं असं म्हणा. आपली चूक झाली तर कबूल करा.मुलं चुकली तर सगळ्यांसमोर त्यांना बोलू नका.स्वतंत्रपणे त्यांच्या खोटं बोलण्याबद्दल, रिलेशनशिप बद्दल बोला.तू नेहमी खरंच बोलतोस असं म्हणून धीर दया.

शेवटी 
Truth is like a sun
And lie is dark night 
You have to choose it
What you want.

हे पटवून द्या.

Swati-Tokekar
डाॅ स्वाती गानू टोकेकर