सर्वात वर

पेट्रोल- डिझेल दर वाढीच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादीचे रुग्णवाहिकेला धक्का मारो आंदोलन

नाशिक –  केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किंमती भरमसाठ वाढ झाली आहे .पेट्रोलचे दर शंभरी जवळ आले आहे. पेट्रोल च्या दरवाढी (Petrol-Diesel Price Hike) मुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दार वाढले असून सर्वसामान्यांना मेटाकुटीला आणले आहे. कोरोना महामारीच्या काळात रुग्णवाहिकेमध्ये इंधन टाकण्याची सोय होत नसल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ कोरोना नियमांचे पालन करत युवक राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली ठराविक पदाधिकाऱ्यांसोबत रुग्णवाहिकेला धक्का मारत अभिनव आंदोलन केले.

नाशिक शहरातील विविध पेट्रोल पंपावर युवक राष्ट्रवादीचे विभाग अध्यक्ष व शहर पदाधिकाऱ्यांनी ग्राहकांना पुष्प देऊन उपहासात्मक आंदोलन  केले. 

देशात इंधनाच्या किंमती (Petrol-Diesel Price Hike) दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. कोरोना मुळे संचार बंदी असताना सर्वसामान्य जनतेचे आर्थिक हाल होत आहे. अशात केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या विचार न करता सततची इंधनदर वाढ(Petrol-Diesel Price Hike) करून तुघलकी निर्णय घेत आहे. भरमसाठ दरवाढ केल्याने सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. इंधनदर वाढीमुळे साहजिक महागाईत वाढ होणार आहे. कोरोना काळात रुग्णाना बेड उपलब्ध होत नसून रुग्णवाहिकेत इंधन टाकणे सुद्धा परवडणारे नाही. यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी रुग्णवाहिकेला धक्का देत उपहासात्मक आंदोलन केले.

 पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी झाल्या पाहिजे, अशी मागणी यावेळी युवक राष्ट्रवादीने केली.या आंदोलना प्रसंगी संदीप खैरे,संदीप गांगुर्डे,संतोष जगताप,अक्षय पालदे, रोहित जाधव, राज रंधवा,जॉनी सोळंकी,राम शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते