सर्वात वर

Zee Marathi :आदित्य मान्य करणार सईवर असलेलं प्रेम..!

ब्रह्मे घर हादरवून टाकायला येणार, सौ.सिंधु जगदिश ब्रह्मे!

मुंबई-झी मराठी वर लोकप्रिय ठरलेल्या माझा होशील ना हि मालिकेने  प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत आदित्य आणि सईचं नेमकं नातं काय हे समजतं नव्हतं. आपण फक्त चांगले मित्र आहोत ह्याच भ्रमात आदित्य होता, पण आता ह्या गुरुवारी दिसणाऱ्या भागात आदित्यला त्याच्या सईवर असलेल्या प्रेमाची तीव्र जाणीव होणार आहे. बंधूमामासमोर आदित्य त्याच्या प्रेमाची कबूली देणार आहे. आणि बंधूमामाच्या आग्रहावरुन लगेच सईला भेटून मनातली गोष्ट देखील सांगणार आहे. पण आदित्यचं सईवर असलेलं प्रेम सईपर्यंत पोहोचेल का? ते समजल्यावर त्या दोघांचं नातं कुठलं वळण घेईल हे पाहणं रंजक ठरेल.

ब्रह्मे कुटुंबात आदित्य आणि त्याचे चार मामा, आप्पा राहत आलेत. बाईविना चालणारं हे घर आजवर प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. ह्या घरातल्या कुठल्याच मामाचं लग्न झालेलं नाही असं आजवर आदित्यला आणि प्रेक्षकाना वाटत होतं, पण आता दादा ब्रह्मेचा भूतकाळ बाहेर येणार असून दादाची लग्नाची, पण टाकलेली बायको, सौ. सिंधु जगदिश ब्रह्मे दादाच्या आयुष्यात परत येणार आहे आणि त्याचबरोबर धोका निर्माण होणार आहे, लपवलेली अनेक गुपितं बाहेर येण्याचा!माझा होशील ना ह्या मालिकेत सिंधु ब्रह्मे म्हणून कोणती कलाकार काम करणार हे जरी अजून गुलदस्त्यात ठेवलेलं असलं तरी सिंधूच्या येण्याने हिवाळ्यात वातावरण तापणार आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम दिसू लागणार आहेत हे नक्की!