सर्वात वर

Zee Marathi ची नवी मालिका “येऊ कशी तशी मी नांदायला”

मिश्किल सासू आणि खट्याळ सुनेची अनोखी धमाल “येऊ कशी तशी मी नांदायला”

झी मराठीच्या (Zee Marathi) प्रेक्षकांना लवकरच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही नवी मालिका मिळणार आहे.या मालिकेत शकु आणि स्वीटू नात्यानं या दोघी सासू सून आहेत पण मनानं मैत्रीच्या धाग्यानं घट्ट बांधल्या गेल्या आहेत.मिश्किल सासू आणि खट्याळ सून मिळून घरात वेगळीच गंमत आणतात. आणि या गंमतीच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

लग्न केवळ दोन जिवांचे मिलन नसून, लग्नामुळे एका क्षणात अनेक नवी नाती जन्माला येत असतात.आपलं  सुखाचं-हक्काचं माहेर सोडून मुलगी एका दुसऱ्या कुटुंबात प्रवेश करते. हे असं घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला सातत्याने उणीव भासत असते. लग्नानंतर जर सासूच तिची सखी झाली तर या नात्यांचा गोडवा आणखीनच वाढतो. आणि घराचं गोकुळ होतं. सासू आणि सुनेच्या एका गोड नात्याची कथा सांगणारी मालिका झी मराठीच्या (Zee Marathi) प्रेक्षकांना लवकरच पहायला मिळणार आहे

या मालिकेची पटकथा सुखदा आयरेयांची असून कथा विस्तार -समीर काळभोर, आणि संवाद किरण कुलकर्णी- पल्लवी करकेरा यांचेआहेत. मालिकेचे दिगदर्शक अजय मयेकर यांनी केले असून शुभांगी गोखले,अदिती सारंगधर,दीप्ती केतकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शाल्व किंजवडेकर नायकाच्या भूमिकेत तर अन्विता फलटणकर नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. झी मराठीवर (Zee Marathi) रसिक प्रेक्षकांना बघता येणार आहे.