सर्वात वर

Zee Marathi : थुकरट वाडीचे विनोदवीर शूटिंगसाठी मुंबईमध्ये दाखल

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित झाले होते. परंतु रसिकांच्या  मनोरंजनाचा वसा घेतलेल्या आपल्या लाडक्या झी मराठी (Zee Marathi) वरील मालिकांचं चित्रीकरण मात्र थांबलंच नाही. लोकडाऊनच्या काळात महाराष्ट्राच्या बाहेर या मालिकांचं चित्रीकरण सुरु आहे.त्यामुळे  प्रेक्षकांच्या मनोरंजनात मात्र खंड पडला नाही. 

कोरोनाच्या या कठीण वेळी सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागला परंतु  हसवण्याचा विडा घेतलेले महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर आणि रसिक प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या ची टीम जयपूरमध्ये शूटिंगसाठी रवाना झाली होती .पण आता नवीन नियमावलीनुसार मुंबईमध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली असल्यामुळे हे विनोदवीर मुंबईमध्ये शूटींगसाठी दाखल  झाले आहेत. तसंच काही कारणांमुळे जयपूरला चित्रीकरणासाठी न गेलेले डॉक्टर निलेश साबळे, सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे आता नवीन भागांतून प्रेक्षकांच्या भेटीस येतील.त्यामुळे चला हवा येऊ द्याचे जुने आणि नुकतेच सहभागी झालेले नवीन विनोदवीर प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आगामी भागात आपले आवडते अभिनेते भाऊ कदम राक्षस बनून प्रेक्षकांना हसवणार आहे तर सागर कारंडे साकारणारा पोस्टमन काका पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक देखील या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा झी मराठीवर (Zee Marathi) पाहण्यासाठी उत्सुक आहे यात शंकाच नाही.