सर्वात वर

शनिवारी नाशिक शहरात “या” विभागात पाणी पुरवठा बंद

नाशिक – सातपुर पाणी पुरवठा विभागातील १००० मी.मी. व्यासाची डी.आय. पाईपलाईनला  काकड मळा, डीपी रोड येथे अचानक गळती सुरु झालेली आहे. या  पाणी गळतीमुळे पाणी वाया जात असुन नागरीकांचा पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. तरी या  पाईप लाईनची दुरुस्ती शनिवार दिनांक २९/०५/२०२१ रोजी सकाळी ९ वाजे पासुन सुरु होणार  असल्याने शनिवार दि. २९ मे  चा प्र.क्र. 26 मध्ये खालील ठिकाणी दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही.

म्हाडा कॉलनी, गोदावरी नगर, पाटील पार्क, जाधव संकुल, (खालचे व वरचे) मेदगे नगर, आशीर्वाद नगर, बंदावणे मळे परिसर, रिगालिया टॉवर इत्यादी परिसरात दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तरी याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन  नाशिक महानगर पालिके तर्फे करण्यात आली आहे.