सर्वात वर

नाशिकमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन : पालकमंत्री छगन भुजबळ लवकरच करणार घोषणा

नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक मध्ये १२ मे दुपारी १२ वाजे पासून ते २२ मे रात्री १२ वाजे पर्यंत कडक लॉक डाऊनचा (Strict Lockdown In Nashik) निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती समोर येत आहे. वैद्यकीय सेवा वगळता सर्व आस्थापना संपूर्णतः बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतीत ही फक्त इन हाऊस काम सुरु राहणार असून या लॉक डाऊन बाबत पालकमंत्री छगन भुजबळ लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचे समजते आहे.

या १० दिवसात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली येणार आहे. त्यामुळे कोणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही.लॉक डाउनच्या (Strict Lockdown In Nashik) पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावर देखील अत्यावश्यक वाहनांना इंधन मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यात काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत फार वाढ होत जरी नसली तरी ही संख्या तीन ते चार हजाराच्या दरम्यान स्थिर आहे. ही संख्या कमी करण्यासाठी कडक लॉक डाऊन शिवाय पर्याय नसल्याने हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना स्थिती पाहता निर्बंध अधिक कठोर करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश काही वेळातच पारित करण्यात येत असून सविस्तर तपशील मा पालकमंत्री व्हिडिओ द्वारे घोषित करतील. असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.