सर्वात वर

विधानसभेत तुफान राडा ! भाजपाचे १२ आमदार एक वर्षासाठी निलंबित

भाजपाचे आमदार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला 

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत मोठा राडा बघायला मिळाला. ओबीसीच्या आरक्षण मुद्द्यावरून सत्ताधारी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की सह शिवीगाळही करण्यात आल्याचा आरोप दोन्ही बाजूकडून करण्यात आला आहे, तालिका अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज काही वेळासाठी स्थगित केल्यानंतर अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा झाला.तालिका अध्यक्षांनी गैरवर्तनाच्या कारणावरून अध्यक्षांनी भाजपच्या १२ आमदारांना (BJP MLA) एक वर्षासाठी निलंबित केले आहे.त्यामुळे भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर सभागृहात चर्चा सुरू असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. काही आमदारांनी तालिका अध्यक्षांचा माईक ओढला. तर काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली. त्यामुळे अध्यक्ष प्रचंड संतप्त झाले होते.परिणामी या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं. आता हे आमदार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी निघाले असून त्यांच्याकडे दाद मागणार आहेत. 
राड्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट केला आहे. 

भाजपच्या निलंबित १२ आमदारांची नावे

अतुल भातखळकर, आशिष शेलार,  गिरिश महाजन, संजय कुटे, अभिमन्यु पवार, पराग आळवणी, योगेश सागर, राम सातपुते, नारायण कुचे, बंटी भागडिया, हरिष पिंपळे, जयकुमार रावल,