सर्वात वर

गंगापूर धरणात ४७ टक्के पाणी साठा : शहरात यंदाच्या वर्षी पाणी कपात नाही – महापौर सतीश कुलकर्णी

महापौरांनी केली गंगापूर धरणाची पाहणी 

नाशिक – नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे.गंगापूर धरणात सध्याच्या परिस्थितीत ४७ टक्के इतका पाणी साठा शिल्लक आहेत हा साठा पुरेसा असल्याने नाशिक शहरात सध्याच्या परिस्थितीला पाणी कपात केली जाणार नाही मात्र शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मा.महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी केले आहे. 

नाशिक शहरात महानगरपालिकेच्या वतीने गंगापूर,गौतमी व कश्यपी या समूह धरणांमधून शहरात पाणीपुरवठा केला जात असतो सध्याची गंगापूर धरणातील पाण्याच्या साठ्याची माहिती घेऊन पाणी कपातीबाबतच्या निर्णयाच्या  दृष्टीने गंगापूर धरणातील (Gangapur Dam) पाण्याच्या साठ्याची पाहणी मा.महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या समवेत मा.सभागृहनेते सतीश सोनवणे,अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता एस एम चव्हाणके, अविनाश धनाईत,पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी केली.

यावेळी धरणातील पाण्याचा साठा गंगापूर धरणात (Gangapur Dam) समूह धरणांमधून जमा होणारे पाणी याबाबतची सविस्तर माहिती मा.महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी घेतली तसेच सध्याचा पाणीसाठा उपलब्ध असणारा पाणीसाठा व असणारी आवश्यकता याची सविस्तर माहिती यावेळी घेण्यात आली धरणात सध्याच्या परिस्थितीत ४७ टक्के इतका पाणी साठा असून तो साठा पुरेसा असल्याने नाशिक शहरात सध्याच्या परिस्थितीला पाणी कपात केली जाणार नसून मात्र शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मा.महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी पाहणीच्या सांगितले.