सर्वात वर

पुण्यात तयार झाली चक्क ७ हजार किलोची “महा मिसळ”

१२०० किलो मिक्स फरसाण ,१५०० किलो मटकी ५०० किलो कांदे ,१८० किलो कांदा लसूण मसाल्यासह ४५०० लिटर पाणी वापरून तयार झाली “महा मिसळ” (Maha Misal)

Maha Misal Pune
Maha Misal Pune

तीस हजार गरजू लोकांना झाले मिसळीचे वाटप 

पुणे –  पुणे तिथे काय उणे असे सर्वचजण नियमित म्हणत असतात ..पुणेरी पाट्या असो वा नवनवीन खाद्य पदार्थ असो पुणे जभरात प्रसिद्ध आहे. खाद्य पदार्थां बरोबरच  पुणेच्या  चमचमीत मिसळीची किर्ती ही सर्वदूर पसरली आहे.त्याचबरोबर पुण्यातील अजून एका उपक्रमाची चर्चा आता सर्वदूर गाजते आहे पुण्यात सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्या संयुक्त विद्यमाने सूर्यदत्ता विष्णू “महा मिसळ” (Maha Misal) वर्ल्ड रेकॉर्ड २०२१ फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते.यात तब्बल ७ हजार किलोची महा मिसळ तयार करण्यात आली होती. हि मिसळ  सात तासात ७ हजार किलो मिसळ शिजवण्याचा तसेच तीन तासात तीनशे एनजीओच्या मार्फत तीस हजार गरजू लोकांपर्यंत ही मिसळ पोहोचवण्याचा विश्वविक्रम ही प्रस्थापित झाला. सूर्यदत्ता फूड बँक आणि सूर्यदत्ता एज्यु सोशिओ कनेक्ट अंतर्गत हा उपक्रम झाला.

महा मिसळ (Maha Misal) तयार करण्यासाठी साधारणता पहाटे ३ वाजल्यापासून सुरवात करण्यात आली आहे. यात मटकी १५०० किलो,कांदा ५०० किलो, आले १२५ किलो, लसूण १२५ किलो,तेल ३५० किलो,कांदा लसूण मसाला १८० किलो,लाल तिखट मिरची पावडर ५० किलो,हळद ५० किलो,मीठ २५ किलो,खोबरे ११५किलो, तेज पान १५ किलो, मिक्स फरसाण १२०० किलो,पाणी ४५०० लिटर, कोथंबीर ५० किलो, अश्या पद्धतीने एकूण ७००० किलो ची महा मिसळ (Maha Misal) शिजवण्यात आली आहे.

Maha Misal Pune
Maha Misal Pune

शेफ विष्णू मनोहर यांच्या माध्यमातुन या आधी देशभरात अनेक रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. सर्वात मोठं पराठा, ५००० किलोची खिचडी,कबाब अश्या विक्रमानंतर आज शेफ विष्णू मनोहरच्या माध्यमातून तब्बल ७ हजार किलोची महा मिसळ (Maha Misal) तयार करण्यात आली आहे. याआधी लोकांच्या उपस्थितीत विश्व विक्रम तयार करण्यात आले. पण हा विश्वविक्रम लोकांच्या अनुपस्थित कोरोनाच्या नियमांचं पालन करून तयार करण्यात आल्याने एक वेगळंच अनुभव होता. अशी भावना यावेळी शेफ विष्णू मनोहर यांनी यावेळी व्यक्त केली.

या प्रसंगी डॉ.संजय चोरडिया म्हणाले, “संस्थेच्या हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव घ्याता यावा तसेच सामाजिक भावनेतून गरीब व गरजु लोकांना अन्नदान करण्यात याव या उद्देशाने महा मिसळ तयार करण्याचं उपक्रम संस्थेत राबविण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत महा मिसळच (Maha Misal) रेकॉर्ड करण्यात आले..”