सर्वात वर

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टास अभूतपूर्व प्रतिसाद

कविकट्ट्यासाठी ४६७ कवीच्या कवितांची निवड 

नाशिक – ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये(94th All India Marathi Literary Conference) होणाऱ्या कविकट्ट्यामध्ये संपूर्ण  महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते परराज्यातूनही आणि परदेशातूनही मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.  कविकट्ट्याच्यासाठी कविता पाठवण्याच्या मुदतीपर्यंत २७५० इतक्या कविता प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये  प्रमाण मराठी भाषा,  विविध बोलीभाषा, त्याचप्रमाणे गझल यांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली,नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद अशा  विविध जिल्ह्यातून आलेल्या मिळून एकूण ४६७ कवींच्या कविता सादरीकरणासाठी निवडण्यात आल्या आहेत.

यामध्ये गझल असून कविता बोलीभाषेच्या (ऐराणी, भोयरी इत्यादी)  आहेत. परदेशातून म्हणजे  अमेरिका, सिंगापूर या ठिकाणच्या कविता पडद्यावर दाखवण्याची कल्पना आहे. एकंदरीत पाहता हा कविकट्टा किमान एक पूर्ण दिवस म्हणजे सहजपणे २४ तास चालेल असे  चित्र आहे. यावेळी प्रथमच गझलसाठी आपण वेगळी व्यवस्था करत आहोत.  

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने श्रीराजन लाखे आणि प्रकाश देशपांडे यांच्या  मार्गदर्शनाखाली समिती प्रमुख  श्री संतोष वाटपाडे, उपप्रमुख स्मिता पाटील व डॉ. स्मिता मालपुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून एकसलग १२ तास बसून  याच्या एकूण नियोजनाची आखणी केलेली आहे.(94th All India Marathi Literary Conference)