सर्वात वर

नाशिकचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

नाशिक– नाशिक मध्ये वाढणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात २६ मार्च ते २८ मार्च रोजी होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन(94th All India Marathi Literary Convention) स्थगित करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केले आहे.

संपूर्ण भारतातून येणाऱ्या साहित्यिकांसह निमंत्रित लेखक- कवी यांच्या सुरक्षतेचा विचार करून हा निर्णय संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ नाशिकच्या साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगांवकर यांच्याशी चर्चा करून घेतला आहे.

साहित्य संमेलन जरी स्थगित करण्याचा निर्णय घेतला असला तरी संमेलनाचे अध्यक्ष मावळते अध्यक्ष आणि सर्व निमंत्रित साहित्यिक यात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे कौतिकराव ठाले पाटील स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा प्रभाव ओसरल्या हे संमेलन पुन्हा घेण्यात येणार आहे.

समित्यांचे काम सुरूच राहणार : विश्वास ठाकूर

कुठलीही आपत्ती येते  ती संधी घेऊन येते असं म्हणतात, हीच बाब आपल्या संमेलनाच्या बाबतीत खरी ठरणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर संमेलन पुढे ढकलले असल्याचे आपणा सर्वांना ज्ञात आहे. यानिमित्ताने संमेलनाचं नियोजन करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळणार आहे. त्यासाठी कोणत्याही समितीने काम थांबवायचं नसून अधिकाधिक अचूक आणि सूक्ष्म नियोजन कसं करता येईल यावर भर द्यायचा आहे. घाईगडबडीत ज्या उणिवा राहिल्या असतील त्या उणीवा दुर करण्याची संधी आहे असे मला वाटते. संमेलन आपल्या सर्वांच्या मेहनतीने यशस्वी व भूतो न भविष्यती होणार यात शंका नाही, चला उठा कामाला लागा, यश आपली वाट पाहताय

94th All India Marathi Literary Convention postponed