सर्वात वर

चांदवडच्या कोव्हीड केअर सेंटर बिल्डिंगला भीषण आग

नाशिक – चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर नवीन सुरु झालेल्या कोव्हीड केअर सेंटर बिल्डिंगला (Covid Center building) दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

आजच दुपारी अडीच वाजेच्या सुमारास या  कोव्हीड केअर सेंटरचे (Covid Center building) उदघाटन होणार होते. या वेळी या सेंटर मध्ये १० ते १२ कोविड रुग्ण दाखल झाले होते.आग लागताच हे रुग्ण बाहेर पळाले.प्राप्त माहिती नुसार चांदवड येथे मोदी कॉप्लेक्समध्ये तळमजल्यावर असलेल्या प्लास्टिक कारखान्यास अचानक आग लागली आणि क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. कारखान्याच्या बाजूला असलेले फर्निचरचे दुकान आणि  हॉटेलला हि आगीने वेढले याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर सुरू होणाऱ्या कोव्हीड केअर सेंटरला (Covid Center building) झळ पोहोचण्याच्या आत तेथे दाखल झालेल्या १० ते १२ रुग्णांना बाहेर काढण्यात आले. 

घटनेची माहिती कळताच खाजगी टँकरवाले सोमा कंपनीचे अग्निशमन दलाचे बंब ,मालेगाव,मनमाड पिंपळगाव येथिल अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली