सर्वात वर

आंबोळी

शीतल पराग जोशी 

अहाहाssss  मस्त गरमागरम आंबोळी आणि त्याबरोबर ओल्या नारळाची चटणी खुप छान लागते.कोकणात केला जाणारा हा खास पदार्थ आहे. आम्ही जेव्हा अलिबागला एका फार्म हाऊस ला गेलो होतो. तेव्हा तिथे आम्ही ही आंबोळी खाल्ली. मग लगेच आम्ही त्यांना receipe विचारून त्याप्रमाणे आंबोळी (Aamboli) करू लागलो. हेच प्रमाण घेऊन तुम्ही कोरडे पीठ पण करून ठेवू शकतात. जेव्हा लागले के भिजवुन आंबोळी (Aamboli) करु शकतात. चला मग आपल्या मुलांना घरचे गरम पदार्थ करून खाऊ घालू या

साहित्य :- 3 वाटी तांदूळ( जुना), 1 वाटी उडीद डाळ, 1/4 वाटी चना डाळ, 1/4 वाटी जाड पोहे, 1 टीस्पून मेथी दाणे, 1 टीस्पून धने, मीठ, हवा असल्यास सोडा, तेल अथवा बटर

कृती :-प्रथम 3 वाटी जुने तांदूळ घेऊन 2 दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. (इंद्रायणी तांदूळ घेऊ नये.) 1 वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी चणा डाळ धुवून स्वच्छ पाण्यात भिजत घालावी. तांदूळ पण भिजत घालावे. त्यातच पाव वाटी पोहे धुवून भिजत घालावे. त्यातच मेथी दाणे आणि धणे पण टाकावे. धणे ऑपशनल आहेत. 7/ 8 तास हे सगळे  भिजल्यावर मिक्सरला वाटून घ्यावे. खूप जाड या खुप बारीक पीठ करू नये. सगळे तांदूळ , डाळी दळून घेतल्यावर त्यात मीठ टाकावे. तुम्हाला थोडी आंबट चव आवडत असल्यास थोडे ताक घालावे.  आणि 3 तास ठेवून द्यावे.  रात्रभर पीठ  ठेवल्यास छान वरती फुगून येते. 

त्यानंतर पीठ चांगले मिक्स करावे. हवा असल्यास सोडा घालावा.निर्लेप तवा अथवा बीडचा तवा घ्यावा. त्यावर ब्रशने तेल लावून घ्यावे. पीठ घट्ट वाटले तर त्यात थोडे पाणी घालावे.  नंतर तवा तापला की त्यावर हे आंबोळी चे मिश्रण घालावे. उतप्पे करतो त्याप्रमाणे मिश्रण घालावे. तेल अथवा बटर घालून दोनी बाजुंनी आंबोळी (Aamboli) करून गरमागरम सर्वे करावी. त्यावर घरचे लोणी घालावे.


संपर्क-९४२३९७०३३२

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी