सर्वात वर

लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट गाठावे : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

बूस्टर डोसबाबत अधिक लक्ष द्यावे

नाशिक – कोविड माहामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण (vaccination) मोहिमेतील २८ दिवसांनंतर देण्यात येणाऱ्या लसीकरणाची यादी अद्यावत करण्यात यावी व बूस्टर डोस सर्वजण वेळेत घेतील याची सतत शहानिशा करावी अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या जिल्हा टास्क फोर्स समितीच्या
बैठकीत जिल्हाधिकारी श्री. मांढरे बोलत होते. याबैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर,
उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, जिल्हा सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय
अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे,
लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे सव्हर्लन्स मेडीकल
ऑफीसर डॉ. प्रकाश नांदापुरकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, १६ जानेवारी पासून सुरू झालेल्या लसीकरण (vaccination)
मोहिमेअंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आलेल्या लसीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी
संबंधितांना अवगत करणे आवश्यक असल्याने त्यासाठी योग्यते नियोजन करण्यात यावे. तसेच
ज्या अधिकारी कर्मचारी यांनी लसी घेतली नाही, त्यांना देखील लस घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी लसीकरण मोहिमेचे काम
करणाऱ्या अधिकारी यांना दिले आहेत.

नागरिकांसाठी सुद्धा काही दिवसातच लसीकरणाचे प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे याबाबत
देखील सर्व स्तरावर योग्य ती व्यवस्था असल्याची खात्री करावी अशा सूचना देखील श्री मांढरे
यांनी दिल्या. त्याचप्रमाणे आजपर्यंतच्या लसीकरण कार्यक्रमांमध्ये ज्या बाबींमध्ये काही
सुधारणा करणे आवश्यक वाटत आहे याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त करून घेण्याच्या सूचना
श्री मांढरे यांनी नोडल अधिकाऱ्यांना दिल्या.

लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे गरजेचे असून त्यामुळेच कोविड विषाणूच्या संसंर्गापासून बचाव
होण्यास मदत होणार आहे. आजपर्यंत साधारण ४१ हजार ८०७ लसीकरण (vaccination) पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहितीदेखील जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी बैठकीत दिली आहे.