सर्वात वर

अभिनेते मनोज नागपुरे यांचे निधन

नाशिक-सुप्रसिद्ध अभिनेते मनोज नागपुरे (Manoj Nagpure) आज यांचे पहाटे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ५३ वर्षांचे होते. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्यामुळे त्यांनी घरीच उपचार करून स्वतःला घरीच आयसोलेशन मध्ये ठेवले होते. मात्र त्यांना त्रास जाणवल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्री त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली,त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे. 

मनोज नागपुरे (Manoj Nagpure) यांनी नाटक, चित्रपटासह अनेक मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या क्राईम डायरी मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक हरहुन्नरी कलावंत गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली, 

आज सकाळी नाशिकच्या स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंसकार करण्यात आले.