सर्वात वर

अभिनेत्री रुपाली भोसलेने सांगितल्या पावसाच्या आठवणी

मुंबई – सृष्टीला नवचैतन्य बहाल करणारा पाऊस सर्वानाच आवडतो उन्हाळ्या नंतर वातावरणात आपल्या हजेरीने सृष्टीला बदलणारा किमयागार प्रत्येकाला हवहवासाच वाटतो.स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेचा(Rupali Bhosale) देखील पावसाळा हा आवडीचा ऋतू. पावसात भिजण्याची एकही संधी रुपाली सोडत नाही.  

दरवर्षी  पाऊस आला कि रुपाली आपल्या आवडत्या मित्रमंडळींसोबत बँड स्टॅण्डला जाऊन पावसात मनसोक्त भिजणं, मक्याचं कणीस आणि आईस्क्रीम खाणं हा तिचा ठरलेला नेम. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे हे शक्य नाही. पण  ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं शूटिंग सध्या सिल्वासा इथे सुरु असल्यामुळे सेटवरच तिने भिजण्याचा आनंद लुटला.

पावसाच्या आठवणींविषयी सांगताना रुपाली (Rupali Bhosale) म्हणाली, ‘मी विरारला रहाते. तिने तिच्या बाल्कनीत छोटीशी बागच तयार केलीय. पावसाळ्यात तर इथला परिसर मन प्रसन्न करुन टाकणारा असतो. याच दरम्यान मोगऱ्याला सुद्धा बहर येतो. घरभर पसरणारा मोगऱ्याचा सुवास मन मोहित करुन टाकतो. यंदा तर माझ्या आईने काकडीची वेलही लावली आहे. त्यामुळे घरगुती काकडीचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे. विरारला रहात असल्यामुळे डोंगर, हिरवळ हे खूप जवळून अनुभवता येतं. पावसामुळे वातावरणात आलेला गारवा, डोंगराच्या कुशीतून मनसोक्त उधळणारे धबधबे हे मला खूप आवडतं. त्यामुळे पाऊस माझ्या खूप जवळचा आहे.