सर्वात वर

जाहिरात विश्व – एपिसोड २९

Advertising World – टेलिव्हिजन जाहिरात प्रसारण (टेलिकास्टिंग)

सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – संगीता सिंग, योगेश शिंत्रे (टेलिव्हिजन जाहिरात प्रतिनिधी)

आणि नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग),  निवेदिका – किशोरी कुलकर्णी

Advertising World

निवेदिका – असं म्हटलं जातं की, कानांनी ऐकलेल्या गोष्टींपेक्षा डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवावा. याच तत्त्वाचा उपयोग करून टीव्हीवरच्या जाहिराती केल्या जातात आणि ग्राहकांमध्ये आपल्या प्रॉडक्टविषयी विश्वास निर्माण केला जातो. संगीताजी, काही छोटे व्यावसायिक असतात. म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरांपेक्षा लहान शहरांमधले जे व्यावसायिक असतात त्यांनी रिजनल चॅनल प्रीफर करावं का?

संगीताजी- नक्कीच त्यांनी रिजनल चॅनल एकदा प्रयत्न करून बघावं; कारण एका शहरासाठी त्यांचा धंदा नसतो. म्हणजे त्यांनी हे नक्की ठरवलं असेल की, कुठे ना कुठे त्यांना त्यांचा धंदा वाढवायचा आहे, तर त्या दृष्टीने त्यांनी नक्कीच रिजनल चॅनल प्रीफर केलं पाहिजे.

योगेशजी – जास्तीत जास्त मोठ्या स्तरावर तुमची जाहिरात करू शकतो.

संगीताजी- टीव्हीवर जाहिरात करण्याचा हाच फायदा असतो की, तुम्ही मोठ्या प्रमाणावर ग्राहकांशी संवाद साधू शकता. तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची माहिती खूप लोकांपर्यंत पोहोचवू शकता. तुम्ही एका शहरासाठी किंवा राज्यासाठी जर विचार करत असाल, त्या लेव्हलवर जायचा विचार करत असाल, तर नक्कीच तुम्ही रिजनल चॅनलचा वापर केलाच पाहिजे.

नंदनजी- प्रिंट मीडियापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडिया हा आपल्याला कधीही स्वस्त पडतो; पण जोपर्यंत आपण तिथे जात नाही आणि अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्या ते लक्षात येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की, आज जर नाशिकसारख्या शहराचा विचार केला तर पूर्वीपासून लोकं केबल चॅनलवर जाहिराती करत होते; पण आज त्यापेक्षाही मोठं बजेट असेल, तिथे जर आपला खर्च करण्याचा विचार असेल तर त्या रकमेमध्ये आपण रिजनल चॅनलला जाहिरात करू शकतो. त्या व्यावसायिकाची प्रतिमा मोठी होते. ग्राहकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्याचा विश्वास बसतो. जर रिजनल चॅनलला केलं तर तुम्हाला त्याचं टेलिकास्ट सर्टीफिकेट मिळतं. कुठल्या मिनिटाला, कुठल्या सेकंदाला तुमची जाहिरात लागलेली आहे हे चॅनलवाले देत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ते परवडतं. आपली प्रतिमा वाढते, आपली प्रतिष्ठा वाढते आणि खर्चाचे रिटर्नस् मिळतात. बाकीचे डिस्ट्रीब्युटर्स, डिलर्स असतात त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो आणि त्यांचीपण चौकशी सुरू होते. असे अनेक फायदे आहेत ते हिडन आहेत; पण ते हळूहळू कळायला लागतात.

निवेदिका – म्हणजे साधारणपणे जाहिरातदार किंवा व्यावसायिकांमध्ये एक गैरसमज असा असतो की, टीव्हीवर जाहिरात द्यायची म्हणजे खूप मोठं बजेट असलं पाहिजे, खूप खर्च येणार आहे, तर या निमित्ताने आपण सांगू शकतो की, असं काही नाहीये. उलट टीव्हीवर तुम्ही तुमची जाहिरात दाखवण्यासाठी द्याल तेव्हा तुम्हाला तेवढाच जास्त फायदा होणार आहे.

नंदनजी- आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक माध्यमाचं आपापलं एक स्वत:चं स्थान आहे, तर प्रत्येक व्यावसायिकाने किंवा प्रत्येक उद्योजकाने त्याच्या त्याच्या प्रॉडक्टच्या गरजेनुसार आणि टार्गेट ऑडियन्सनुसार त्याचं माध्यम निवडलं पाहिजे.

निवेदिका – मग बजेटचा विषय निघालाच आहे तर योगेशजी जेव्हा एखादा छोटा जाहिरातदार किंवा व्यावसायिक तुमच्याकडे येतो तेव्हा त्याचं बजेट कमी असतं. यासाठी तुम्ही काही वेगळे प्लॅन किंवा पॅकेजेस देता का?

योगेशजी- बजेटचं ठराविक प्लॅनिंग आपल्याला टीव्हीसाठी करता येतं. दिवसभरातून किती वेळा आपली जाहिरात टीव्हीवर दिसली पाहिजे. ही सुविधा जेवढी हाय ठेवणार तेवढा आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो. त्यात सातत्य हवं. हीच सुविधा सातत्याने राहिली तर निश्चितच त्याचा परिणाम चांगला मिळतो. समजा एखाद्या जाहिरातदाराचं बजेट कमी आहे, तर कमी बजेटमध्येदेखील आपण टीव्हीवर उत्तम प्लॅनिंग करू शकतो. या व्यतिरिक्त परिणाम न करणारे प्रॉडक्टसुद्धा आहेत. ज्यात एलबँड येतं, अ‍ॅसटोनबँड येतं. हे आपण ठराविक वेळेच्या शेड्युलनुसार करू शकतो. तुम्हाला ज्यावेळेस प्रेक्षक जास्त आहेत असं वाटतं किंवा आपण जे प्लॅनिंगमध्ये करतो त्या टाईमबँडमध्ये आपण ते प्ले करू शकतो. याच्या व्यतिरिक्त जे काही ऑप्शन्स आहेत ते पण जाहिरातदार त्यांच्या बजेटनुसार ठरवू शकतात, की यापैकी काय घ्यायचं आहे. आता हळूहळू पारंपरिक पद्धतीच्या प्लॅनिंगमध्ये टीव्हीपण आता इनक्लुड करायला सुरुवात केली पाहिजे. एक समस्या अशी आहे की, ग्राहकाला टीव्हीवर जाहिरात करायची म्हणजे एक मनात बाऊ आहे की तिथे खर्च जास्त आहे; पण असं नसतं. जसं आता नंदनजी म्हटले की, चांगली एजन्सी किंवा चॅनलच्या प्रतिनिधींशी बोलून तुमची गरज काय आहे आणि तुमच्याकडे बजेट किती आहे हे जर एकत्र केलं आणि त्यावर चांगलं प्लॅनिंग झालं तर निश्चित तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आता वेळ अशी येते की, तुम्हाला 360 अंशाच्या कोनातून जावं लागणार आणि कुठलं एक माध्यम सोडून चालणार नाही.

निवेदिका – बजेटचा जरी मुद्दा आपण बाजूला ठेवला तरीसुद्धा बर्‍याचदा काही छोट्या व्यावसायिकांना असं वाटतं की, माझं प्रॉडक्ट एका ठराविक एरिआसाठी आहे तर मी रिजनल चॅनल का ठरवायचे? यांना तुम्ही काय सांगाल?

योगेशजी- यात सोपं मी एकच सांगेन की, जो आज छोटा आहे त्याला उद्या मोठं व्हायचंच आहे. ही सगळ्यांनाच ओढ असते की, आज माझा ठराविक टर्नओव्हर आहे, तर तो हळूहळू वाढलाच पाहिजे. तुम्ही आधीपासून जर हे प्लॅनिंग केले तर तुम्ही त्याच खर्चात पुढच्या सगळ्या वाटचालीकरता हायवे आतापासूनच तयार करता आहात. म्हणजे आज समजा कोणी व्यावसायिक म्हटला की, माझा फक्त नाशिकच फोकस आहे; पण समजा त्यांना एक वर्षाने, दोन वर्षांनी जर उत्तर महाराष्ट्रात जायचं आहे तर तुम्ही नाशिकमध्ये दिसणारच आहात किंवा तुम्ही ज्या शहरांमध्ये तुमचा प्रेझेन्स आहे किंवा हवाय तिथे तुम्ही दिसणारच आहात. प्लस तुमचं हळूहळू ब्रॅडींग व्हायला सुरुवात होते आणि तुमचा आत्मविश्वास वाढत जातो. टीव्हीचे रिटर्नस काय आहेत किंवा टीव्हीचा रिस्पॉन्स काय आहे? हे लक्षात येते.

नंदनजी- थोडक्यात काय तुम्ही तिथे त्या शहरात पोहोचायच्या आधी तुमचं नाव पोहोचलेलं असतं. तुमची प्रतिमा तयार झालेली असते आणि मग तुम्ही जेव्हा येणार,  तेव्हा त्याचा फायदा होतो. आता बरेचसे ज्वेलर्स आहेत पुण्याचे, मुंबईचे आहेत हे आता महाराष्ट्रभर पसरत आहेत; पण त्यांचं नाव तिथे अगोदरच झालेलं आहे. त्यावेळेला तिथे अशी उत्सुकता होती की, अरे हा ज्वेलर आपल्याकडे येतो आहे, असेही बर्‍याच वेळा होतं, तर जाहिरात करणे हा खर्च नसून ती गुंतवणूक आहे, तर तुम्ही ही गुंतवणूक करून ठेवता त्या शहरात, जिथे तुम्हाला भविष्यात जायचेय.

योगेशजी- आणखी एक यामध्ये मला असं नमूद करावंसं वाटेल की, टीव्हीवर जाहिरात केल्याने एक बेसिक फायदा होतो. तो म्हणजे तुमचा सीपीपी खूप कमी होतो. सीपीपी इज कॉस्ट पर पर्सन. तुम्ही 100 रु. टीव्हीवर खर्च केला तर जितके लोक बघणार आहेत याचा जर विचार केला तर निश्चितपणे आज जरी तुमचे टार्गेट ऑडियन्स नसतील तरी भविष्यात तुमचे ते टार्गेट ऑडियन्स होणार आहेत. या दृष्टीने जर विचार केला तर कॉस्ट पर पर्सन ते इतकं कमी होतं की टीव्हीसारखं परवडणारं माध्यमच नाही, असं तुमच्या लक्षात येईल.

निवेदिका – म्हणजे या जाहिरात क्षेत्रामध्ये नेहमीच पुढचा आणि दूरचा विचार करून आतापासूनच मीडिया प्लॅनिंग करायला पाहिजे आणि त्यामध्ये टेलिव्हिजन या माध्यमाकडे दुर्लक्ष करून नक्कीच चालणार नाही.

योगेश- बरोबर.

निवेदिका – तुम्हा दोघांचे आभार.

पुढचा विषय – टेलिव्हिजन प्रॉडक्शन डिपार्टमेंट  (Advertising World )                                                                                          

(क्रमशः)

jahirat VIshwa

टिप –(Advertising World ) सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.

वाचकांसाठी संपर्क –  योगेश शिंत्रे  – ९५४५३ ६२७७७, संगीता सिंग – ९०११० ३००८०

नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com