सर्वात वर

जाहिरात विश्व – एपिसोड २८

(Advertising World) टेलिव्हिजन जाहिरात प्रसारण (टेलिकास्टिंग)

सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

(Advertising World) तज्ज्ञ – योगेश शिंत्रे, संगीता सिंग (टेलिव्हिजन जाहिरात प्रतिनिधी) आणि नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग),  निवेदिका – किशोरी कुलकर्णी

निवेदिका – जे न देखे रवी, ते देखे कवी हे वाक्य तुम्ही ऐकलं असेलच; पण आजच्या काळात जे न देखे कवी ते देखे टीव्ही, असं म्हणावं लागेल इतकी या माध्यमाची दृष्टी व्यापक झाली आहे. याचाच फायदा घेऊन आपण जर जाहिरात केली तर आपलं प्रॉडक्ट अगदी जगाच्या कानाकोपर्‍यातही पोहोचू शकतं. गेल्या काही भागांमध्ये आपण व्हिडिओ जाहिरातींचं प्रॉडक्शन याविषयी जाणून घेत होतो. आता वळूया जाहिरातींचं प्रसारण अर्थात टेलिकास्ट विषयाकडे.

संगीताजी, तुमच्या चॅनलवर जेव्हा एखादी जाहिरात टेलिकास्ट करायची असते आणि त्यासाठी अनेक जाहिरातदार, व्यावसायिक ज्यावेळी तुमच्याकडे येतात तेव्हा खरं पहिला मुद्दा निघतो तो टीआरपीचा; कारण टीआरपी हा शब्द आम्ही सामान्य लोक नेहमी ऐकत असतो की, एखाद्या चॅनलचा किंवा एखाद्या प्रोग्रॅमचा टीआरपी जास्त आहे आणि म्हणून त्याला जाहिराती जास्त आहेत, तर सुरुवातीला मला तुम्हाला हे विचारायचं आहे की, टीआरपी म्हणजे नक्की काय?

संगीताजी- टीआरपी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट. टीआरपी त्या प्रोग्रॅमची पसंती किती आहे हे तुलना करण्यासाठी असतो. त्यामुळे व्यावसायिकांना मदत होते. त्यांच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही या प्रोग्रॅममध्ये जाहिरात केली तर हा टार्गेट ग्रुप तुम्हाला मिळेल.

निवेदिका – योगेशजी, या टीआरपीविषयी आणखी काय सांगाल?

योगेशजी- टीआरपी आपण दोन प्रकारे दाखवू शकतो. एक म्हणजे चॅनलचा टीआरपी म्हणजे जे विविध चॅनल्स तुम्ही प्लॅन करता त्या चॅनल्सचे सर्व टीआरपी आणि त्यापुढे चॅनल्स फायनल झाल्यानंतर त्यावर जे प्रोग्रॅम्स चालतात त्या ठराविक प्रोग्रॅमचा टीआरपी. टीआरपी गृहीत धरणं हे खरं तसं तांत्रिकदृष्ट्या गरजेचं आहे; पण सर्व दृष्टीनं आपण रिटेल सेक्टरचा विचार केला तर पहिले चॅनलची कॅटॅगिरी ठरवावी लागते. आपल्याला जीसी म्हणजे जनरल एंटरटेनमेंट कॅटॅगिरी घ्यायची आहे की आपल्याला न्यूज जॉनरमधले चॅनल्स घ्यायचे आहेत.

न्यूज जॉनरमधले घेतले तर मग रिजनल घेणार की नॅशनल घेणार. पहिले आपल्याला कुठे पोहोचायचं आहे, आपला टार्गेट ग्रुप काय आहे, रिच काय हवाय, नॅशनल हवाय, रिजनल हवाय, यावर आपल्या चॅनल्सचे जॉनर एकदा ठरलं की, मग टीआरपीचा विचार येतो. त्या चॅनल्समधून मग फिल्टर करणार की, मी कुठल्या वेळेत दाखवलं पाहिजे. माझा टीजी कॅप्चर करण्याकरता.

निवेदिका – आणि त्या टीआरपीच्या बेसिसवरती ठरवू शकतात की, आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी कोणतं चॅनल आणि त्यावरचा कोणता प्रोग्रॅम आपण निवडला पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त ग्राहक ती जाहिरात बघतील. नंदनजी, याबाबतीत तुमचं काय मत आहे?

नंदनजी- आपण टीआरपी म्हणतो; पण त्यामध्ये आपण आपल्या प्रॉडक्टनुसार ठरवावं. समजा स्त्रियांशी संबंधित आपलं उत्पादन आहे, तर कुठल्या वयामधल्या कोणत्या स्त्रिया कोणता प्रोग्रॅम किती वेळ बघतात? लहान मुलं कुठला प्रोग्रॅम किती वेळ बघतात, पुरुष किती बघतात आणि याहीपेक्षा वेगळा वर्ग म्हणजे सी वर्ग किती बघतो, बी वर्ग किती बघतो, ए वर्ग कुठलं चॅनल जास्त बघतो, हे सगळं सविस्तर आपण अभ्यासू शकतो आणि प्रत्येक चॅनलचा प्रतिनिधी आपल्याला त्याची सविस्तर माहिती देऊ शकतो. त्यानुसार आपण आपलं प्रॉडक्ट कुठल्या चॅनलवर दिलं की आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचू शकतो. इतकं साधं गणित या लोकांनी करून ठेवलेले आहे.

योगेशजी- हे सगळे तुम्हाला ज्या एरियामधली माहिती गोळा करायची आहे त्या ठराविक एरिआमध्ये सर्वसाधारणपणे लोकांसाठी एक मीटर असतं. ते खूप खासगी असतं की, ते कुठे लावतात हे कोणालाही कळत नाही. ते मीटर दिवसभरात कुठल्या खासगी चॅनलवर काय बघितलं गेलं आहे तो डाटा गोळा करतं आणि त्याची महिन्याची सरासरी काढली जाते आणि मग वर्गवारीप्रमाणे तुम्हाला ठराविक गोष्टी मिळतात.

निवेदिका – नुसतं टीआरपी म्हटलं तरी त्यात खूप डिटेलिंग असतं.

योगेशजी- तुम्ही जर बरोबर पैसे खर्च करणार आहात त्याचा पुरेपूर मोबदला हवा असेल, तर असा खोल विचार करून माझ्या प्रॉडक्टची गरज, मला कुठला टीजी कॅप्चर करायचा आहे, मग तो टीजी जेंडर वाईज असेल, कॉमन जेंडर असेल तर एज् ग्रुप वाईज त्याचं क्लासिफिकेशन होईल आणि त्यानंतर ज्याला आपण म्हणतो की, सायको-एकॉनॉमिक क्लास ए, बी, सी तो एक असतो आणि त्यानंतर वन बिलियन रूल्स आणि अंडर वन बिलियन असे पण टाऊन असतात किंवा सिटीज असतात.

या सगळ्याचं वेगवेगळ्या व्हर्टीकल्समध्ये ते रिपोर्ट बनले जातात आणि त्या सगळ्यांचं अ‍ॅव्हरेज असतं. धीस इज व्हॉट एक्झाटलि टीआरपी इज, तुम्ही तुमच्या ठराविक मागणीनुसार ठरवू शकतात की, आपल्याला नेमकं काय करायचं आहे.

निवेदिका – म्हणजे टीआरपी हा शब्द सतत आमच्या कानावर पडत असतो. त्याच्यामागे हे एवढं मोठं गणित असतं आणि याचा नक्कीच फायदा जाहिरातदारांना किंवा व्यावसायिकांना होतो. जेव्हा त्यांना त्यांची जाहिरात एखाद्या विशिष्ट चॅनलसाठी किंवा प्रोग्रॅमसाठी दाखवायची असते.

संगीताजी- आणि मुख्य म्हणजे आता बाकीचं जे अ‍ॅप आहे ते आपण डाऊनलोड केलं तर त्यावर सगळ्या डिटेल्स म्हणजे कोणत्या चॅनलची, कोणत्या कार्यक्रमाचा टीआरपी कसा आहे, मुख्य 20 कार्यक्रम कोणते, आठवड्यामधले ते सगळे डिटेल्स आपल्याला त्या अ‍ॅपवर मिळतात. या नवीन टेक्नॉलॉजीमुळे खूपच सोपं झालं आहे.

नंदनजी- यामध्ये टीआरपीपण असतो. जीआरपी नावाचापण एक प्रकार असतो. म्हणजे ग्रॉस रेटिंग पॉईंट; पण टीआरपीवरून आपल्याला साधारण समजू शकतं आणि आपल्याला एकदा आपण प्रयत्न केले की, वेगवेगळ्या चॅनल्स तर आपल्याला अंदाजपण येतो की आपल्याला कुठून रिस्पॉन्स मिळतो. कुठून नाही मिळत. सर्वसाधारणपणे आपण सगळ्या चॅनल्सचा थोडा थोडा वापर करावा.

प्रत्येक ठिकाणी आपला रिच पाहिजेे आणि प्रत्येक चॅनलवर आपण थोडं थोडं बजेट वाटलं गेलं तर आपल्या स्वत:ला आपला रिस्पॉन्स कळतो की, आपण काय केलं पाहिजे; कारण हे सँपल इन्स्ट्रूमेंट लावून ते केलेलं असतं; पण आपण आपल्या स्वत:साठी म्हणून आपण केलं तर याचा चांगला उपयोग होईल, असं मला वाटतं.

निवेदिका – नंदनजी, तुम्ही काय म्हणाल की, जाहिरात एजन्सीच्या (Advertising World) दृष्टीने जेव्हा आपण टीव्हीवरून एखादी जाहिरात प्रदर्शित करतो त्याआधी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?

नंदनजी- आता योगेशने सांगितल्याप्रमाणे टीआरपीचा विचार केलाच पाहिजे. जर ग्राहकाला टीआरपी विचारायचा असेल, तर त्याने एजन्सी आणि चॅनलची लोकं यांच्याबरोबर बसून सखोल अभ्यास केला पाहिजे. खर्‍या अर्थाने जाहिरात करण्याचं पहिलं पाऊल आहे. त्यांचं प्रॉडक्ट, त्यांचा टार्गेट ऑडियन्स आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेट. या बजेटचा विचार करून मग चॅनलशी डिल केलं पाहिजे; पण मी असं सुचवेन की, जेवढं बजेट तुम्ही लावताय त्यामध्ये सातत्य ठेवा. तुम्ही एक महिना, दोन महिने जाहिराती केल्या की, तुम्हाला रिर्झल्ट मिळायला पाहिजे, असं नक्कीच नाहीये.

तुम्ही वर्षभराचं पॅकेज करा. वर्षभराचं जर डिल तुम्ही चॅनलबरोबर केलं, तर ते तुम्हाला स्वत:हून काही सुविधा देतात. कुठल्या तरी कार्यक्रमाशी सहकारी प्रायोजकत्व देतील किंवा आणखी काही तुम्हाला जसा फायदा होईल अशा गोष्टी तुम्हाला स्वत:हून देतात. पेमेंट मात्र तुम्हाला महिन्याच्या महिन्याला अ‍ॅडव्हान्समध्ये करायचे असते. त्यामुळे आपल्याला ते फायदेशीर ठरते. तुमची प्रतिमा वाढत असते; पण तुम्ही ज्यावेळेला सातत्य ठेवता त्यावेळेला मात्र तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो.

निवेदिका – श्रोतेहो, टेलिव्हिजनवरून जाहिरात प्रसारणाची खूप छान माहिती आपल्याला मिळते आहे.

ही चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे, तेव्हा भेटूया पुढच्या भागात …नमस्कार

पुढचा विषय – टेलिव्हिजन जाहिरातीचे प्रसारण २ (Advertising World)   

 (क्रमशः)                                                                                                                                                                                                                   

jahirat VIshwa

टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.

वाचकांसाठी 

संपर्क –  योगेश शिंत्रे  – ९५४५३ ६२७७७, संगीता सिंग – ९०११० ३००८०

नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com