सर्वात वर

जाहिरात विश्व – एपिसोड ३४

टेलिव्हिजन कॅमेरा वर्क भाग २ (Advertising World)

सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – प्रशांत कुलकर्णी (ज्येष्ठ कॅमेरामन DOP), नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग), निवेदिका – किशोरी कुलकर्णी

प्रशांत कुलकर्णी ,नंदन दीक्षित, निवेदिका – किशोरी कुलकर्णी

निवेदिका – कॅमेरा हा आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला दिलेला तिसरा डोळा आहे, असे म्हटलं जातं; पण याडोळ्याचा वापर प्रभावीपणे कसा करायचा, हे मात्र कॅमेरामनच्या हातात असतं. जाहिरात क्षेत्रात तर कॅमेरामनअगदी महत्त्वाचा असतो. प्रशांतजी, जेव्हा एखादी व्हिडिओ जाहिरात करायची असं ठरतं आणि कॅमेरामनची एन्ट्रीहोते तेव्हा तो कोणकोणत्या गोष्टी बघतो किंवा एकंदर सगळ्या प्रोसेसमध्ये त्याचा काय रोल असतो?

प्रशांतजी- नुसतं शूटिंग करणे म्हणजे कॅमेरावर्क नाही, तर त्यामागे खूप मोठी प्रोसेस आहे. जेव्हा डायरेक्टरसांगतो, ही स्क्रिप्ट आहे, हे प्रॉडक्ट आहे आणि याची जाहिरात करायची आहे तेव्हा स्क्रिप्टनुसार शॉट डिव्हिजनकेलं जातं. त्याचा स्टोरी बोर्ड लिहिला जातो. म्हणजे त्या वाक्यासमोर काय आपल्याला शूट करायचं आहे, कायप्रत्यक्ष दाखवायचं आहे, याचं रेखाटन केलं जातं. चित्र काढलं जातं. मग जवळचा हवा की दूरचा शॉट हवा, कीखांद्याच्या वरचा शॉट पाहिजे, अति लांबचा शॉट पाहिजे, की क्रेन वापरायची, ट्रॉली वापरायची, या सगळ्याटेक्निकल गोष्टींचा यात अंतर्भाव असतो. हा स्टोरी बोर्ड दिग्दर्शक, सहाय्यक दिग्दर्शक आणि कॅमेरामन हे बसूनकरतात. पेपर वर्क पक्कं असलं की, प्रत्यक्ष शूटिंगला अडचण येत नाही. त्यानंतर लोकेशन, कुठे शूट करायचंय,
तिथली लाईटची व्यवस्था कशी आहे, दिवसा-दुपारी-रात्री कधी शूट करणार आहोत? त्या वेळेचं भान ठेवावं लागतं.जाहिरातीची गरज कशी आहे, म्हणजे जाहिरात सकाळची दाखवायची आहे की रात्रीची दाखवायची आहे, ग्राहकालाकाय अपेक्षित आहे, याचा विचार करावा लागतो. सगळीकडे आपणच ग्रेट असं मानून चालत नाही;

कारण जाहिरात(Advertising World) त्याची असते. हा सगळा विचार करून तिथली लाईटची व्यवस्था कशी असेल, अतिरिक्त लाईटिंग करावंलागेल का? लाईट कुठले वापरावे लागतील याचाही विचार कॅमेरामन आणि डायरेक्टर करतो. डायरेक्टरला सगळंटेक्निकल शिक्षण असतंच असं नाही किंवा नसेल तरी चालेल; कारण तो स्क्रिप्ट, त्यातला कंटेन्ट, कलाकारलोकांना सहाय्य करणे, यात खूप बिझी असतो. त्यामुळे तो खूपशा गोष्टी कॅमेरामनवर सोडत असतो. कॅमेरामन नेत्याला न्याय दिला पाहिजे, अशी त्याची अपेक्षा असते. हे सगळं करून जेव्हा प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात करतो तेव्हा काहीही घडू शकते. त्या प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता त्या कॅमेरामनकडे पाहिजे. म्हणजे पावसाचंवातावरण नसेल; पण पाऊस आला तर काय करायचं, त्या लाईटच्या व्यवस्थेमध्ये शूट करायचं का? करणार असाल तर कोणते मार्ग अवलंबाल?कॅमेरामनची पण एक टीम हवी. जे त्याचं ऐकतात. लाईटमन, ट्रॉली ढकलणारीमाणसं, क्रेनवाली माणसं ही सगळी त्याची टीम असते. त्याच्या सहाय्याने तो सगळं काम करत असतो. हे सगळं
त्याला मॅनेज करता आले पाहिजे. तो फक्त कॅमेरामन नसतो. म्हणून कुठल्याही कार्यक्रमाचा कॅमेरामन आणिजाहिरातीचा कॅमेरामन यात हा फरक आहे. हे सगळं तो दिग्दर्शकाच्या मदतीने, त्याच्या सल्ल्याने, त्यांच्याखांद्याला खांदा लावून स्वत:च्या सहकार्यांबरोबर शूट करत असतो.

निवेदिका – नंदनजी याबद्दल तुम्ही काय सांगाल?

नंदनजी- जाहिरातीचं नेमकं शूट करणारा कॅमेरामन वेगळा असतो. सीरिअलचं शूट करणारा वेगळा असतो. एक कॅमेरामन हे 2-3 शॉटस् शूट करतात; पण त्याच त्या त्या वेळेचं भान आणि त्या त्या वेळेचं स्पेशलायझेशनअसतंच असतं. या व्यतिरिक्त कॅमेरामन क्रिएटिव्ह हवा. मला आठवतंय, एक मधाची जाहिरात (Advertising World) होती. नुसतं मधपाहिलं तर ते चांगलं दिसत नाही; म्हणून ते करताना त्या कॅमेरामनने उत्तम प्रकारचे ग्रीस ओतलं होतं आणि ते मध म्हणून आपल्यासमोर दिसतं. कुठल्या गोष्टीतून काय चांगलं दाखवता येईल हीसौंदर्यदृष्टी सुद्धा कॅमेरामनकडे हवी. एक इंजिन ऑईलची जाहिरात करायची होती. त्यात मकॅनिक गाडीच्या इंजिनमध्ये ऑईल टाकतो. ते इंजिन ते ऑईल परत त्याच्या तोंडावर थुंकून टाकतं, असा शॉट होता. त्या कलाकारावरती ते इंजिनऑईल खरोखर आलं, तर त्याचे डोळे, नाक, कान सगळंच कामातून जाईल. मग तिथे काय वापरायचं? हे त्या क्रिएटिव्ह टेक्निकलचं काम असतं. कुठली गोष्ट वापरल्यावर कलाकाराला हार्मफूल होणार नाही. या सगळ्यागोष्टींचा विचार तिथे केला पाहिजे. म्हणून दिग्दर्शकाला जितकं महत्त्व आहे तेवढं कॅमेरामनला महत्त्व आहे. हेसगळं टीम वर्क असतं. ज्युनिअर टीममधला जो मेंबर असेल तोसुद्धा एखादी चांगली गोष्ट आपल्याला सांगूनजातो; पण निर्णय घेणारे हे दोघं असतात.

प्रशांतजी-
या जाहिरातीचा उल्लेख केला म्हणून मी त्याच्यावर थोडं सांगतो. इंजिन ऑईलची जाहिरात करतानाआम्ही तीन कॅमेरे वापरले होते. कलाकार एक होता. त्याच्या तोंडावर गाडी ऑईल फेकते, असा शॉट होता. तोएकदाच शूट होणार होता. परत परत करणे शक्य नव्हते; कारण त्यासाठी खूप यंत्रणा मागवली होती. ऑईलफेकायला पडद्यामागच्या ज्या गोष्टी असतात त्या दिसत नसतात; पण होत असतात. छोटा गोप्रो नावाचा कॅमेराआम्ही इंजिनात लपवला होता. जेणेकरून इंजिनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो शूट घेतला जाईल. दुसरा कॅमेरालांबच्या शॉटवर लावला होता. गाडी, कलाकार, आजूबाजूचं लोकेशन हे सगळं त्यात दिसत होतं. तिसरा कॅमेरात्या व्यक्तीचा क्लोज-अप घेण्यासाठी लावलेला. त्याचे हावभाव दिसण्यासाठी. ही घटना एकदाच होणार आहे.
त्यामुळे तिन्ही कॅमेरे एकाचवेळी चालू करणे गरजेचे होते. त्याचे दोन टेक फक्त झाले. दुसरा टेक घेणं आवश्यकहोतं; कारण ऐनवेळी गडबड होऊ नये. त्यावेळी आम्ही दोन ड्रेस तयार ठेवले होते. या सगळ्यांमुळे त्याजाहिरातीचा खूप उत्कृष्ट परिणाम झाला.

निवेदिका –
सामान्य प्रेक्षकांकडून त्या जाहिरातीचे खूप कौतुक केलं गेलं असेल.

प्रशांतजी- हो, आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे या सगळ्यामागे जी पार्श्वभूमी असते, की त्याचा स्टोरी बोर्ड होणं,त्याची रंगीत तालीम होणं, वेगळ्या ठिकाणी जाऊन, डमी मॉडेल वापरून आम्ही रंगीत तालीम केली होती. हाचफरक एखादा साधा कॅमेरामन आणि जाहिरातीचा कॅमेरामन यात असतो.

निवेदिका –
नंदनजी, ‘कॅमेरा वर्क’ या विषयी एखादी आठवण, एखादा प्रसंग…

नंदनजी- एका जाहिरातीसाठी फक्त पैंजण या दागिन्यांची जाहिरात करायची होती. कॅमेरामन आणि आमचं
एकमत अशा गोष्टींवर झालं की, मॉडेल घ्यायचं; पण त्याचा चेहरा दाखवायचा नाही. फक्त मॉडेलचं पाऊलदाखवायचं आणि त्याच्यावर काम करायचं. संपूर्ण जाहिरात आम्ही फक्त पाऊलांवर केली. वेगवेगळ्या ठिकाणीआमच्या कॅमेरामनने लाईटिंग खूप सुंदर केलं होतं, ते इतकं खुलून दिसलं की जाहिरात खूप प्रसिद्ध झाली.आम्ही दाखवलं की, थोड्या पाण्यात तिचं पाऊल ओलं झालं आहे किंवा दगडावर ते पाऊल आहे आणि खासमुंबईहून समुद्रावरून रेती आणली. शेवटचा शॉट असा होता की, त्या मॉडेलने रेतीवरून पाऊल उचललं आणि तिथेपायल हे नाव आलं. हे कॅमेरामनचं वर्क आहे. त्याच्या लाईटिंगचं काम आहे. त्यासाठी ही जाहिरात फार प्रसिद्धझाली.

निवेदिका – या सगळ्यामुळे जाहिरात परिणामकारकही झाली आणि दर्शकांच्या लक्षातही राहिली.

नंदनजी- हो. आणि त्या सीनमध्येच त्या जाहिरातीचं महत्त्व होतं.

प्रशांतजी- ‘पॅशन ऑफ वर्क’ हे असेल तर तुमचं काम तुम्ही छान पद्धतीने करू शकता. त्यासाठी लागणारीसगळी मेहनत घ्यायची तुमची तयारी पाहिजे.

निवेदिका – नक्कीच. या सुंदर माहितीबद्दल धन्यवाद!

पुढचा विषय – सोशल मिडिया

टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या वाचकांसाठीखास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.

jahirat VIshwa

वाचकांसाठी संपर्क – नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१ प्रशांत कुलकर्णी – ९४०३७ ७४६८२
Website – www.nirmitiadvertising.com