सर्वात वर

जाहिरात विश्व – एपिसोड ३५

सोशल मिडिया
सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – सोहम गरुड (सिईओ Diggmeup, S. G Studio), नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग),निवेदिका – किशोरी कुलकर्णी (Advertising World)

Advertising World

निवेदिका – आज इंटरनेट हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. जगाच्या दोन टोकांवरच्या माणसांना या इंटरनेटने जवळ आणलंय; तसेच माहितीचा एक नवीन खजिनाच आपल्यासमोर खुला केला आहे आणि आता तर खिशातल्या मोबाईलमुळे या इंटरनेटचा वापर सहज शक्यही झाला आहे. मग याच माध्यमाच्या मदतीने आपल्या प्रॉडक्टची जाहिरात केली तर? जाहिरात क्षेत्रात यालाच म्हणतात डिजिटल मीडिया. सोहम, बर्‍याचदा असं होतं की, आपल्याला प्रॉडक्टची जाहिरात(Advertising World) करायची आहे म्हटल्यावर आमच्या डोळ्यासमोर पटकन ट्रॅडिशनल मीडिया येतात. म्हणजे प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल; पण मग आजकाल डिजिटल मीडिया हासुद्धा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, असं लक्षात येत आहे. याविषयी काय सांगशील.

सोहम – डिजिटल मार्केटिंग म्हणजे मुळातूनच इंटरनेटच्या वापराने लोकांपर्यंत पोहोचणे. यात सोशल नेटवर्क मार्केटिंग असतं. हे सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये येतं आणि जर तुम्हाला तुमची जाहिरात गुगल सर्च इंजिनमध्ये जर करायची असेल, तर त्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि गुगल अ‍ॅड वर्ल्डस असं आहे. गुगल अ‍ॅड वर्ल्डस हे पेड मार्केटिंग झालं. तुम्ही गुगलला जाहिरात करण्यासाठी एक ठराविक रक्कम देता.
त्यातून गुगल एक महिना तुमची जाहिरात करतं. उदाहरणार्थ नाशिकमधल्या एखाद्या हॉटेलची जाहिरात(Advertising World) करायची आहे, तर कोणी गुगलमध्ये सर्च केलं की, नाशिकमधील हॉटेल्स तर त्यात तुमच्या हॉटेलची जाहिरात सगळ्यात पहिली दिसायला हवी, तर ते ठराविक पेड मार्केटिंग झालं. हे डिजिटल मार्केटिंगचं माध्यम आहे. बाकीचे माध्यम म्हणजे फेसबुक, ट्विटर, लिंक इन, इनस्टाग्राम हे सगळे सोशल नेटवर्क झाले, तर ते सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये तुम्ही डायरेक्ट फेसबुक किंवा ट्विटरवर तुमच्या पेजची किंवा प्रोफाइलची जाहिरात करता आणि तुम्हाला फेसबुक सांगते की, तुमची जाहिरात किती टार्गेटेड आहे, किती लोकांपर्यंत पोहोचू शकते.

तुम्हाला त्यातून कळतं की, किती लोकांपर्यंत खरोखर तुमची जाहिरात पोहोचली आहे आणि त्यातल्या किती लोकांनी ती पाहिली आहे आणि किती लोकांनी त्यावर दखल घेऊन काहीतरी तुमच्या पेजवर येणं किंवा प्रोफाईलवर भेट करणं, असे झालेलं आहे; तर मुळातच हे सोशल मीडिया मार्केटिंग झालं आणि ई-मेल मार्केटिंगमध्ये तुम्ही ग्राहकाला दर आठवड्याला किंवा दर महिन्याला जे ई-मेल पाठवता तर त्यामुळे ते एकमेकांना बांधून राहातात. म्हणजे जर संक्रांतीचा सण असेल, तर तुमच्या सगळ्या ग्राहकांना संक्रांतीचा ई-मेल पाठवा, दिवाळीच्या शुभेच्छा पाठवा. या प्रकारचं मार्केटिंग म्हणजे ई-मेल मार्केटिंग झालं. त्यांच्यामधून तुम्ही जास्तीत जास्त अडकून राहू शकता आणि त्यांनादेखील तुमच्या ब्रँडबद्दल आत्मविश्वास येतो आणि पुढच्यावेळी तुमच्याकडे जास्त प्रॉडक्ट घेतात. मुळातच तुमचे प्रॉडक्ट एकमेकाद्वितीय राहते.

निवेदिका – मग आता मला असं सांगा की, ट्रॅडिशनल मीडिया आणि सोशल मीडिया, डिजिटल मीडिया यांची तुलना केली तर याचे काय फायदे सांगता येतील?

सोहम – मुळातच ट्रॅडिशनल मीडिया म्हणजे प्रिंट मीडिया किंवा वर्तमानपत्रातील जाहिराती.(Advertising World) यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्हनेस. ट्रॅडिशनल मीडियामुळे जी आपल्याला पेपरमध्ये जाहिरात करायची आहे किंवा रेडिओवर करायची आहे किंवा टीव्हीमध्ये करायची आहे, ती करणे खूप महाग झाले आहे. मुळातच कॉस्ट इफेक्टिव्हनेस जो आहे तो डिजिटल मार्केटिंगमध्ये सगळ्यात जास्त आहे, तर समजा तुलनाच करायची तर ट्रॅडिशनल मीडियामध्ये कमीत कमी खर्चामध्ये तेच काम जास्त लोकांपर्यंत पोहोचतं; तर हा कॉस्ट इफेक्टिव्हनेस झाला. दुसरं असं की, तुम्हाला खरोखर कळतं की, तुमचा कंटेट किती लोकांपर्यंत पोहोचतो आहे. इ. तुम्ही आता एखाद्या होर्डिंगवर जाहिरात लावली किंवा वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली तर ती जाहिरात एक दिवसापुरती येईल किंवा एक महिनाभर होर्डिंग राहील; पण त्यात तुम्हाला नक्की कळणार नाही की, किती लोकांनी जाहिरात पाहिली किंवा किती लोकांपर्यंत पोहोचली.

डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये बरोबर डाटा येतो की, किती लोकांनी जाहिरात पाहिली वगैरे. हा एक फायदा होतो डिजिटल मार्केटिंगचा;आणि अजून एक फायदा म्हणजे की, वर्तमानपत्रात जी जाहिरात((Advertising World) दिली जाते त्यावर होणारा परिणाम आपल्याला मोजता येत नाही; परंतु सोशल मीडियावर जर मार्केटिंगकेलं, तर त्या पेजवर डायरेक्ट व्हिजीट होते. ती जाहिरात पाहून ग्राहक सरळ मेसेज करू शकतात. हा रिअर टाईम डाटा असतो. म्हणजे फेसबुकची जाहिरात करून तुम्हाला एका आठवड्यात रिझल्ट मिळणार असेल, तर तेच वर्तमानपत्रामध्ये एक महिन्यानंतर मिळेल.

निवेदिका – म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि कमीत कमी बजेटमध्ये आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचू शकतो. या मीडियाचं काम कसं चालतं? सगळ्यात ही क्रिया कशी असते?

सोहम- जर एखाद्या कंपनीला त्यांची जाहिरात ((Advertising World)) करायची आहे, तर ट्रॅडिशनल मीडियासारखं त्यांना ब्राऊचर करणं किंवा ग्राफिक डिझाईनमधून पोस्टर बनवणं हे करावं लागतं, तर हेच डिजिटल मार्केटिंगमध्येही करतात.सगळ्यात आधी त्यांच्या ब्रँडला समजून घ्यावं लागतं आणि त्यांच्यावतीने लोकांपर्यंत पोहोचेल असा कंटेट तयारकरावा लागतो.

असं म्हणतात की, टू मॅच देअर व्हॉईस! तर असं ब्रँडचा व्हॉईस मॅच करून ते लोकांपर्यंत कसं पोहोचेल याचं क्रिएटिव्ह ब्रीफ बनवणं गरजेचं असतं. त्यानंतर त्यांचा लोगो किंवा इतर मार्केटिंग मटेरिअल यांची भाषा वापरून म्हणजे कलर स्किम किंवा इतर फाँटस् वगैरे; तर ते फोलो करून ग्राफिक डिझाईन मटेरिअल बनवतात आणि त्यानंतर त्यांच्या ठराविक लोकांचा अभ्यास करावा लागतो. उदा. तुम्हाला जर 20-30 वयाच्या लोकांपर्यंत पोहोचायचं असेल आणि त्यांचा इंटरेस्ट तुमच्या प्रॉडक्टमध्ये असेल किंवा दुसर्‍या सारख्याचप्रॉडक्टमध्ये असेल तर त्यांची तुलना करावी लागते आणि मग त्यातून तुम्हाला किती डिटेल लोकांपर्यंत पोहोचायचं आहे हे ठरवावे लागते. म्हणजे सगळ्यात जास्त लोक फेसबुकवर असल्यामुळे त्यांच्याकडे खूप डिटेल डाटाही असतो.

फेसबुकची प्रसिद्धी एकदम छोट्या छोट्या शहरांमध्येही असल्यामुळे तुम्ही ठराविक ते भागातपण करू शकता. म्हणजे जसं की, नाशिकमध्ये कॉलेजरोड, गंगापूररोड अशा छोट्या छोट्या जागेचीपण टार्गेटिंग फेसबुकवर करू शकता किंवा कॉलेज विद्यार्थी, शाळेतले लोकं यांच्यापर्यंत तुमचं प्रॉडक्ट म्हणजे शाळेचे एखादं पुस्तक किंवा कॉलेज विद्यार्थ्यांसाठीचं पुस्तकं याची जाहिरात करायची असेल तर तुम्ही सरळ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. याप्रमाणे टार्गेटिंग होतं. तर डिजिटल मार्केटिंगमधून इफेक्टिव्ह निकाल मिळण्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंगचा उपयोग होतो.

निवेदिका – म्हणजे यावरून हे लक्षात येतं की, आधुनिक काळातला जो मीडिया आहे म्हणजे डिजिटल मीडिया हासुद्धा जाहिरातीसाठी उत्तम माध्यम ठरू शकतो, मोबाईल अ‍ॅप असोत, वेबसाईट असोत, डायरेक्ट मेल असोत किंवा गुगल जाहिरात नेटवर्क. कोणत्याही प्रकारे जाहिरात केली तरी डिजिटल मीडिया तुम्हाला फायदेशीरच ठरणार आहे. आता तर आपला भारत डिजिटल इंडिया होऊ पाहातोय. अशावेळी आपल्या प्रॉडक्टची जाहिरात या इंटरनेटच्या माध्यमातून करणे ही काळाची गरज आहे, असे म्हणायला हरकत नाही.

_____________

नमस्कार वाचकहो,
जनस्थान या लोकप्रिय अशा ई न्यूजपेपर च्या माध्यमातून जाहिरात विश्व (Advertising World)
ही मालिका आपण सर्वांनी अतिशय लोकप्रिय केलीत, दर रविवारी ही मालिका प्रसिद्ध झाली की अनेक फोन, मेसेजेस वरून एपिसोड आवडल्याची पावती मला मिळत होती, काहींना शंका असल्यास ते विचारून निरसन करीत होते. अनेकांनी सर्व एपिसोड स्वतःकडे सांभाळून ठेवले असल्याचेही सागत आहेत.

आपण सर्वांनी या मालिकेला जो प्रचंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे तसेच जनास्थान चे संचालक श्री अभय ओझरकर यांचे देखील मनापासून आभार मानतो. जाहिरात विश्व (Advertising World) ही मालिकेचा हा शेवटचा भाग आहे.आपणास या क्षेत्राबद्दल काहीही माहिती हवी असल्यास माझ्या अनुभवानुसार आपणास नक्कीच मदत करेन अशी ग्वाही देतो.
धन्यवाद….!!!
नंदन दीक्षित
संचालक
निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग

jahirat VIshwa

टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता. या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.

वाचकांसाठी संपर्क – नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१ सोहम गरुड – ९९२३० २०३७५
Website – www.nirmitiadvertising.com