सर्वात वर

शुभ्रा च्या आयुष्यात येणार एक नवी व्यक्ती : मालिकेत चिन्मय उदगीरकर ची एन्ट्री

मुंबई – झी मराठीवरील (Zee Marathi) ‘अग्गबाई सूनबाई’(Agabai Sunbai) या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद दिला आहे. ही मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे.ह्या मालिकेत शुभ्राचा स्वभाव खूप वेगळं आहे, ही शुभ्रा थोडी बुजरी आहे, ती एका मुलाची आई आहे, तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर की नाही हा भाव तिच्या मनात सतत असतो.

या मालिकेत आसावरीने घराची सूत्र हाती घेतली आहेत सोहम तिचा राईट हॅन्ड आहे, अभिजीत राजेंनी घरची जबाबदारी स्वीकारली आहे. दोघांमध्ये बाबा आणि मुलीचं नातं आहे. बबडूची (मुलाची) पूर्ण जबाबदारी असल्याने ती घरातच आहे, ती अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे, शुभ्रा अशी आहे कारण मुलाच्या म्हणजेच बबडूच्या जन्माच्यावेळेस निर्माण झालेली गुंतागुंत आणि सोहम सोबत संसार टिकवण्यासाठीची तिची धडपड.

लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सोहम आणि सुझेन चं प्रेमप्रकरण शुभ्रा समोर आलं. प्रकरणाचा शुभ्रा ला मोठा धक्का बसल्याने ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. त्याचवेळेस तिच्यासमोर अनुराग गोखले नावाची व्यक्ती येते, कोण आहे हा अनुराग? हे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या निमित्तानते ‘चिन्मय उदगीरकर’(Chinmay Udgirkar) पुन्हा एकदा झी मराठी (Zee Marathi) वर पुनरागमन होतंय. याआधी चिन्मय झी मराठीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला होता. पाहायला विसरू नका ‘अग्गबाई सूनबाई’ (Agabai Sunbai) सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वा.झी मराठीवर रसिकांना बघता येणार आहे.