
कोरोना उपचारासाठी अक्षय कुमार रुग्णालयात :”रामसेतू” चित्रपटातील ४५ जण कोरोना पॉझिटिव्ह
अभिनेता गोविंदा, आदित्य नारायण ही कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज तो कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला आहे. अशी माहिती त्याने ट्विट करून आपल्या चाहत्यांना दिली आहे.तसेच अक्षय कुमारच्या चित्रीकरण सुरु असलेल्या बहुचर्चित “रामसेतू”चित्रपटातील सेट वरील तब्बल ४५ जुनियर आर्टिस्टचे कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या सर्वांना क्वारंटाईन करणात आले आहे.कोरोना संसर्गामुळे आता चित्रपटाचे चित्रीकरण १५ दिवस स्थगित करण्यात आले असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
अक्षय कुमारने (Akshay Kumar) याबाबतची माहिती अक्षयने नुकतीच आपल्या चाहत्यांनी दिली. याबाबत अक्षयने ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, आपण केलेल्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. तुम्ही केलेली प्रार्थना फळाला येत आहे. मी आता ठीक आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अधिक काळजी घेण्यासाठी मी हॉस्पीटलमध्ये भर्ती झालो आहे. आशा करतो लवकरचं घरी परतेन. तुमची काळजी घ्या. त्यांने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे.
गेल्या काही दिवसापासून राजकीय क्षेत्रातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे चित्र होते आता कोरोनाने बॉलिवूडला ही विळखा घातला आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) पाठोपाठ अभिनेता गोविंदा, आदित्य नारायण, एजाज खान,हि कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे वृत्त आहे.
रविवारी अक्षय कुमारने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यांने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. ”माझा आज सकाळी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. मात्र, माझ्या संपर्कात येणाऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी देखील कोरोनाची चाचणी करुन घ्यावी,” असे ट्विट अक्षयने केले होते.