सर्वात वर

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरूपाचे : शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

मुंबई- धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे गंभीर आहे. ते काल मला भेटले होते.त्यांच्यावर आरोपाविषयी मला त्यांनी सखोल सविस्तर माहिती दिली आहे.त्यांच्या विषयीची एक तक्रार पोलिसांकडे आली आहे.या प्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ते करतीलच .राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून याचा विचार करावा लागेल. याबाबत सहकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे व्यक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 

आज काही वेळापूर्वी मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले धनंजय मुंडे यांचे काही व्यक्तींशी संंबंध होते. त्यावरुन मुंडे यांच्या विरोधात पोलिसात काही तक्रारी करण्यात आल्या. हे प्रकरण या दिशेने जाईल, याची कल्पना धनंजय मुंडे यांना होती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि या बाबतचे आदेश प्राप्त करुन घेतला होता. पण धनंजय मुंडे यांनी मला दिलेली माहिती मी पक्षासमोर मांडेन, संघटनेच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन आणि चर्चा करून लवकरच याबाबत निर्णय घेऊ, त्यामुळे आता याप्रकरणात फारसे बोलण्यासारखे काहीही नाही, धनंजय मुंडे यांचा राजीनामा आपल्याकडे आलेला नाही असे ही शरद पवार यांनी सांगितले.

पवार साहेबच निर्णय घेतील – धनंजय मुंडे 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मी काल भेटलो असून काल मी प्रेस नोट द्वारे माझी भूमिका स्पष्ट केली असून आता पुढचा निर्णय शरद पवारच घेतील असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले 

धनंजय मुंडे यांनी तातडीने राजीनामा द्यावा – किरीट सोमय्या 

धनंजय मुंडे यांच्या विरोधात विरोधक ही मैदानात उतरले आहे.बलात्कार प्रकरणी धनंजय मुंडे यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी केली आहे. 

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून धनंजय मुंडे  यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी केली आहे. 

दरम्यान काही वेळेपूर्वीच धनंजय मुंडे राष्ट्रवादी कार्यालयात पोहचले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु असून धनंजय मुंडे यांच्या बाबत लवकरात लवकर निर्णय होण्याची शक्यता आहे.